उन्हाळी ऐवजी लाल रंगडा कांदा लागवडीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 05:15 PM2018-10-23T17:15:39+5:302018-10-23T17:16:10+5:30

खामखेडा : विहिरींना पाणी कमी असल्याने खामखेडा परिसरातील शेतकरी उन्हाळी कांदा ऐवजी लाल रांगडा कांदा लागवडीकडे कल दिसून येत आहे.

Filled with red-colored Onion Plant instead of summer | उन्हाळी ऐवजी लाल रंगडा कांदा लागवडीवर भर

उन्हाळी ऐवजी लाल रंगडा कांदा लागवडीवर भर

googlenewsNext
ठळक मुद्देरंगडा कांद्याची लागवड करण्याच्या तयारी शेतकरी दिसून येत आहे.

खामखेडा : विहिरींना पाणी कमी असल्याने खामखेडा परिसरातील शेतकरी उन्हाळी कांदा ऐवजी लाल रांगडा कांदा लागवडीकडे कल दिसून येत आहे.
नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यात कसमादे परिसरातील गिरणा काठावरील खामखेडा, सावकी विठेवाडी, भऊर, पिळकोस, बगडू बेज, भादवन, विसापूर, बिजोरे आदी गावांमघ्ये मोठया प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड केली जाते. उन्हाळी कांदा या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. या भागातील सर्वसाधारण शेतकरी तीनशे ते चारशे क्विंटल कांदा चाळीत साठवितो. परंतु चालू वर्षी पाहिजेत्या प्रमाणात पाऊस पडला नाही, त्यामुळे या वर्षी विहिरींनी तळ गाडला आहे. त्यामुळे यापुढे उन्हाळी कांद्याच्या ऐवजी रांगडा लाल कांदा लागवड करण्याचा विचारात आहे.
या वर्षी अल्पशा पावसामुळे धरणे, नालाबंडिंग याचा पाणी न आल्यामुळे पाण्याची साठवणूक झाली नाही. त्यामुळे जमिनीच्या भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली नाही. परिणामी विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली नाही. ज्या काही शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी आहे, असे शेतकरी या वर्षी उन्हाळी कांद्या ऐवजी रंगडा लाल कांद्याची लागवड करण्याचा तयारीत आहेत. कारण लाल रांगडा कांदा हा उन्हाळी कांद्यापेक्षा एक ते दीड महिना आधी तयार होतो. रंगडा कांद्याला जरी थोड्याफार प्रमाणात पाण्याचा तुटवडा झाला तरी त्याची थोडया फार प्रमाणात गळती होते. तसे उन्हाळी कांद्याला जर पाण्याचा तुटवडा झाली तर त्याची गळती होत नाही. तेव्हा पुढे पाणी राहणार नाही म्हणून रंगडा कांद्याची लागवड करण्याच्या तयारी शेतकरी दिसून येत आहे.
सद्या रंगडा कांद्याच्या रोपांचा तुटवडा दिसून येते आहे. तेव्हा कोठे रंगडा कांद्याचे रोप कोठे मिळते का याची विचारांना करताता दिसून येत आहे. पुढे परतीचा पाऊस पडेल आणि विहिरींना पाणी उतरेल आशा आशेवर काही शेतकºयांनी रंगडा कांद्याचे बियाणे टाकले होते. आणि परतीच्या पाऊसाने पाठ फिरविली शिवाय विहिरींना पाणी उतरले नाही. आशा शेतकºयांना कांद्याचे रोपे विकल्याशिवाय पर्यत नाही. त्यामुळे आता रोपांचा भाव वाढला आहे. हे रोपे चढत्या किमतीत विकली जात आहेत. सद्या उन्हाळी कांद्यासह लालकांद्याच्या भावामघ्ये चांगली भाववाढ झाल्याने पुढे पाण्याअभावी कांद्याला चागला भाव मिळेल या अपेक्षेने मिळेल त्या ठिकाणी आणि मिळेल त्या किमतीत शेतकरी रोपांची खरेदी करून रंगडा कांद्याच्या लागवडीवर भर देत आहे.

Web Title: Filled with red-colored Onion Plant instead of summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.