दिव्यांग मुलांनी बनविलेल्या वस्तू घेतल्या सिनेतारकांनी...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 02:10 PM2022-10-24T14:10:26+5:302022-10-24T14:10:40+5:30

या विद्यार्थ्यांना वस्तू निर्मितीच्या आनंदासह मोबदला मिळाल्याने आपणदेखील कांहीतरी कमाऊ शकतो ही भावना त्यांच्यात निर्माण होते.

Film stars took items made by disabled children... | दिव्यांग मुलांनी बनविलेल्या वस्तू घेतल्या सिनेतारकांनी...

दिव्यांग मुलांनी बनविलेल्या वस्तू घेतल्या सिनेतारकांनी...

Next

- अशोक बिदरी
मनमाड ( नाशिक ) : निगराणी प्रशाळेतील गतीमंद, मतिमंद, मुकबधीर, सेलेब्रल पाल्सी आदी विविध बहुविकलांग प्रकारातील दिव्यांग मुलांना व्यावसायिकदृष्ट्या त्यांच्या पायावर ऊभे करण्यासाठी छोटे-मोठे उद्योगाचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून कांही वस्तुंची निर्मिती करण्यात येते.

अशा वस्तू समाजातील कांही दानशूर व्यक्ती मोबदला देऊन विकत घेतात. हा मोबदला या दिव्यांग मुलांना त्यांच्या निर्मिती योगदानानुसार वाटप करण्यात येतो. त्यामुळे या विद्यार्थ्यांना वस्तू निर्मितीच्या आनंदासह मोबदला मिळाल्याने आपणदेखील कांहीतरी कमाऊ शकतो ही भावना त्यांच्यात निर्माण होते. परिणामी या दिव्यांग मुलांच्या पालकांना त्यांची मुले ओझं न वाटता ते त्यांचा आनंदाने स्विकारतात.
अशाच उपक्रमाचा एक भाग म्हणून दिवाळीच्या सणासाठी विविध नक्षीदार मातीच्या पणत्या आकर्षक रंगाने रंगविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात येऊन पणत्यांची निर्मिती करण्यात येत आहे.

या पणत्या हिंदी स्टार वाहिनीवरील अनुपमा या मालिकेतील बा ही व्यक्तीरेखा साकारणार्‍या मुंबईतील अभिनेत्री अल्पना भुच यांच्या निदर्शनास आल्या. त्यांना या पणत्या खुप आवडल्याने त्यांनी १५० पणत्यांची तात्काळ ऑर्डर दिली व त्यायोगे या दिव्यांग मुलांनी निर्माण केलेल्या वस्तू विकत घेऊन एकप्रकारे सामाजिक दायित्व निभावले. मुंबईच्या चंदेरी दुनियेत या पणत्यांची महती गेल्याने या दिव्यांग मुलांच्या वस्तू जास्तीत-जास्त विकत घेतल्या जातील.

Web Title: Film stars took items made by disabled children...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.