मुक्तिधाम मंदिरात हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 01:36 AM2018-07-18T01:36:29+5:302018-07-18T01:36:55+5:30
नाशिकरोड : येथील मुक्तिधाम मंदिरामध्ये मंगळवारी भर पावसात ‘जिनियस’ या हिंदी चित्रपटाचे चित्रिकरण करण्यात आले. तब्बल पाच तास सुरू असलेल्या या चित्रिकरणामुळे परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
नाशिकरोड : येथील मुक्तिधाम मंदिरामध्ये मंगळवारी भर पावसात ‘जिनियस’ या हिंदी चित्रपटाचे चित्रिकरण करण्यात आले. तब्बल पाच तास सुरू असलेल्या या चित्रिकरणामुळे परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
‘जिनियस’ या हिंदी चित्रपटातील चित्रीकरणासाठी मंगळवारी सकाळी १० वाजता मुक्तिधाम मंदिरात सुरूवात झाली. पावसाच्या रिमझिममध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. चित्रपटात प्रमुख भूमिका असलेले कलाकार उत्कर्ष शर्मा हे मुक्तिधाममध्ये दर्शनासाठी येत असतानाचे चित्रिकरण करण्यात आले. चित्रिकरणासाठी परिसरातील सुमारे २०० स्थानिक कलावंतांना संधी देण्यात आली आहे. चित्रिकरणा निमित्त मुक्तिधाम मंदिराच्या प्रवेशद्वारावर रंगीबेरंगी पडदे व फुलांची उत्कृष्ट सजावट करण्यात आली होती. मंदिराबाहेर लष्कर, पोलीस यांच्या उत्तर प्रदेशातील क्रमांक असलेल्या गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. यावेळी मंदिरा बाहेरून कमांडो व पोलीस मंदिरात घुसत असल्याचे चित्रीकरण करण्यात आले.