‘शिवनेरी’ची  आज अखेरची धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 01:09 AM2017-10-31T01:09:57+5:302017-10-31T01:10:03+5:30

राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाकडून नाशिक-पुणे-नाशिक या मार्गावर सोळा ‘शिवशाही’ प्रवासी वाहतूक करीत असल्यामुळे ‘शिवनेरी’चा मंगळवार (दि.३१) अखेरचा ठरणार आहे.

 The final run for Shivnarine is today | ‘शिवनेरी’ची  आज अखेरची धाव

‘शिवनेरी’ची  आज अखेरची धाव

Next

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाकडून नाशिक-पुणे-नाशिक या मार्गावर सोळा ‘शिवशाही’ प्रवासी वाहतूक करीत असल्यामुळे ‘शिवनेरी’चा मंगळवार (दि.३१) अखेरचा ठरणार आहे.  नाशिक-पुणे-नाशिक या मार्गावर बारा शिवनेरी वातानुकूलित बसेस दररोज धावत होत्या. या मार्गावर दिवसाला २४ फेºया शिवनेरी पूर्ण करीत होती; मात्र शिवनेरीची जागा आता ‘शिवशाही’ बसने घेतली आहे. यामुळे आजपासून शिवनेरी बस या मार्गावर धावणार नसल्याचे महामंडळाच्या नाशिक विभागाच्या प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले
आहे.  सध्या नाशिक-पुणे मार्गावर चौदा शिवशाही बसेस दिवसाला २८ ते ३० फेºयांद्वारे प्रवासी वाहतूक करीत आहे. दरम्यान, या मार्गावर प्रवासी वाहतूक करणाºया निमआराम वर्गातील ‘हिरकणी’लाही महामंडळाने विश्राम दिला आहे. एकूण २७ निमआराम बसेस या मार्गावरील थांबविण्यात आल्या आहेत. एकूणच धार्मिक पुण्यनगरीवरून विद्येचे माहेरघर गाठणाºयांना ‘शिवशाही’चा एकमेव आधार महामंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे.  एसटी प्रशासन उत्पन्न व प्रवासी वाढविण्यासाठी विविध उपक्र म, योजना राबवित आहेत. खासगी प्रवासी वाहतूकदारांसोबत स्पर्धा करताना प्रवाशांना अत्याधुुनिक स्वरूपाच्या बसेसमधून प्रवास करता यावा यासाठी महामंडळाने शिवशाही बसेस सुरू केल्या आहेत. अत्याधुनिक सुविधा मात्र भाडे शिवनेरीच्या तुलनेत अर्धेच असल्याने या शिवशाही बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन महामंडळाने ‘शिवनेरी’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title:  The final run for Shivnarine is today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.