दुर्गापूजा उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 01:06 AM2019-09-28T01:06:05+5:302019-09-28T01:06:32+5:30

गांधीनगर येथे बंगाली बांधवांकडून नवरात्रीच्या सहाव्या माळेपासून साजरा करण्यात येणाऱ्या दुर्गा पूजा उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. श्री दुर्गादेवी मूर्ती साकारण्याचे व मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे.

 Final stage of preparation for Durga Puja festival | दुर्गापूजा उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

दुर्गापूजा उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

Next

नाशिकरोड : गांधीनगर येथे बंगाली बांधवांकडून नवरात्रीच्या सहाव्या माळेपासून साजरा करण्यात येणाऱ्या दुर्गा पूजा उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. श्री दुर्गादेवी मूर्ती साकारण्याचे व मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे.
गांधीनगर येथे बंगाली बांधवांकडून साजरा करण्यात येणाºया दुर्गापूजा उत्सवाचे यंदाचे ६६ वे वर्ष आहे. नाशिक सार्वजनिक दुर्गा पूजा समितीच्या वतीने नवरात्रीच्या सहाव्या माळेपासून शुक्रवार (दि.४ आॅक्टोबर) सकाळी ९.३० वाजता पूजा करून मूर्तीची स्थापना करण्यात येऊन त्यानंतर पुष्पांजली करण्यात येईल. रात्री ९ वाजता बोधन, शनिवारी सकाळी ७.३० वाजता पूजा, १०.३० वाजता पुष्पांजली, दुपारी १ वाजता भोग सायंकाळची आरती ७ वाजता होईल. याचप्रमाणे रविवार, सोमवारी धार्मिक कार्यक्रम होऊन सोमवारी दुपारी २ वाजता हवन होणार आहे.
मंगळवारी दसºयाला सकाळी पूजा, पुष्पांजली दुपारी ११.३० वाजता अपराजिता पूजा, भोग, दुपारी ३ वाजता सिंदूर उत्सव व सायंकाळी मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे. तसेच उत्सवाच्या काळात सायंकाळी ७.३० ते रात्री १० वाजेपर्यंत पहिल्या दिवशी म्युझिक फिआस्टा, दुसºया दिवशी दुर्गा फेस्ट टॅलेन्ट हन्ट, म्युझिकल सागा फटाफटी, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, ज्येष्ठांसाठी विविध खेळांच्या स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, १८ वर्षांपुढील वयोगटासाठी प्रश्नमंजूषा, विवाहित महिलांसाठी प्रियो बौथन, मुलांसाठी विविध खेळ, दसºयाच्या दिवशी सकाळी ११ वाजता क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
दुर्गापूजा उत्सवामध्ये सर्व भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक सार्वजनिक दुर्गापूजा कमिटीचे अध्यक्ष सुजॉय गुप्ता, सरचिटणीस दीपक घोष यांनी केले आहे.
पर्यावरणपूरक मूर्ती
श्री दुर्गापूजा उत्सवात १३ फूट उंचीची श्री दुर्गादेवीची मूर्ती सोबत साडेसात फुटाच्या दुर्गादेवीच्या कुटुंबातील सरस्वती, लक्ष्मी, कार्तीकस्वामी व गणपतीची मूर्ती साकारली जात आहे. कोलकाता येथील गंगा नदीची माती, बांबू, तांदळाची साळ, तांदळाचा भुसा, वॉटर कलर यापासून पूर्णपणे पर्यावरणपूरक मूर्ती साकारली जात आहे. लाकडी आयुधे, कोलकाता पद्धतीची साडी, दागिने आदि साहित्य चढविले जाणार आहे.

Web Title:  Final stage of preparation for Durga Puja festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.