उन्हाळी कांदा लागवड अंतिम टप्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 05:34 PM2020-01-20T17:34:44+5:302020-01-20T17:35:06+5:30
खामखेडा : दर वर्षी खामखेडा परिसरात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या वर्षी मात्र मघ्यतरी पाऊसामुळे कांद्याची रोपे खराब झाल्याने या वर्षी उशीरा कांद्याची लागवड केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामखेडा : दर वर्षी खामखेडा परिसरात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या वर्षी मात्र मघ्यतरी पाऊसामुळे कांद्याची रोपे खराब झाल्याने या वर्षी उशीरा कांद्याची लागवड केली जात आहे.
दर वर्षी खामखेडा परिसरात उन्हाळी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. उन्हाळी कांदा या पिकाकडे नगदी पिक म्हणून पाहिले जाते. उन्हाळी कांदा लागवडीसाठी आॅक्टोबर मिहन्याच्या शेवटच्या आठवड्यांपासुन सुरवात केली जाते. ती नोहेंबर ते साधारण पंधरा डिसेंबर पर्यत केली जाते.
कारण गेल्या काहि वर्षापासून विहिरींचे पाणी मार्च पर्यत राहते. मार्च मिहन्या नंतर विहिरीचे पाणी कमी-कमी होत जाते. परंतु यावर्षी पावसाळा जास्त प्रमाणात असल्याने जराही पाऊसामुळे कांद्याची रोपे खराब झाली होती. तरी शेतकऱ्याने उन्हाळी बियाणे टाकून रोपे तयार करून कांद्याची लागवड करीत आहे.
उन्हाळी कांदा पिकासाठी थंडी फार पोषक असते.तेव्हा चालू वर्षी भरपूर पाऊस झाल्याने मार्च मिहन्यापर्यत थंडी राहील असा शेतकरी वर्गाचा वाटते.एक महिना जरी थंडी कांदा राहिली तरी कांद्याचे पीक चांगले येईल.
परंतु सर्वत्र कांदा लागवड सुरु असल्याने मजूर टँचाई जाणवत आहे.पूर्वी सहज मजूर उपलब्ध होते असे. कारण पूर्वी बागयती शेती अल्प प्रमाणात असल्याने शेतीच्या कामासाठी अगदी सहज मजूर उपलब्ध होत असे. परंतु विज्ञान युगात शेतीचा विकास झाल्याने पूर्वी काम करणारा मजूर शेतकरी झाल्याने आता गावात मजुर उपलब्ध होत नाही. आता सर्वत्र उन्हाळी कांदा लागवडचा मौसम असल्याने मजूर मिळत नाही. तेव्हा शेतकर्याला मजुरासाठी वनवण करीत भटकावे लागत आहे. तेव्हा बाहेर गावाहुन मजूर आणावे लागत आहे.
त्यामुळे या कांदा लागवडीमुळे मजुराना सुगीचे दिवस आले आहेत. त्याकडे शेतकऱ्यांची मजुरांसाठी बुकिंग केलेली असते. सध्या कांदा लागवड ही ठेका पध्दतीने दिली जात असल्याने काही वाहनधारक मजुरामघ्ये कामा लागून जाता.त्यामुळे वाहनधारकाला वाहनाचे भाडे पण मिळते.व मजूरी पण मिळते.