फेरमतमोजणी प्रक्रिया एक ा महिन्यापर्यंत स्थगित

By admin | Published: April 8, 2017 01:13 AM2017-04-08T01:13:29+5:302017-04-08T01:14:43+5:30

नाशिक : भालचंद्र वाघ यांनी फेरमतमोजणीसाठी केलेल्या अर्जानुसार शुक्रवारी होणारी फेरमतमोजणी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अखेर रद्द केली.

The finalization process will be postponed for one month | फेरमतमोजणी प्रक्रिया एक ा महिन्यापर्यंत स्थगित

फेरमतमोजणी प्रक्रिया एक ा महिन्यापर्यंत स्थगित

Next

 नाशिक : अवघ्या एका मताने पराभूत झालेले ग्रंथमित्र पॅनलचे उमेदवार भालचंद्र वाघ यांनी फेरमतमोजणीसाठी केलेल्या अर्जानुसार शुक्रवारी (दि. ७) होणारी फेरमतमोजणी प्रक्रिया
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अखेर रद्द केली.
फेरमतमोजणी प्रक्रियेच्या पूर्वसंध्येला जनस्थान पॅनलचे एकमेव विजयी उमेदवार धनंजय बेळे यांनी ही फेरमतमोजणी प्रक्रिया रद्द करण्याची मागणी अर्जाद्वारे करून ही फेरमतमोजणी सावानाच्या घटनेला धरून नसल्याचे म्हटले आहे. धनंजय बेळे यांच्याप्रमाणेच फेरमतमोजणी प्रक्रियेच्या शुक्रवारी (दि. ७) सकाळी राजेश जुन्नरे, विनोद राठोड, मोहन उपासनी, मकरंद सुखात्मे, नंदन रहाणे, सतीश महाजन, श्यामला चव्हाण, प्रभाकर कुलकर्णी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांना मतपेट्यांचे सील तोडू नये तसेच फेरमतमोजणी प्रक्रिया थांबवावी या आशयाचे पत्र दिल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांनी ही फेरमतमोजणी प्रक्रिया तीस दिवसांपर्यंत स्थगित करण्यात येत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
शुक्रवारी होणाऱ्या फेरमतमोजणी प्रक्रियेसाठी शुक्रवारी सकाळपासूनच सार्वजनिक वाचनालयाच्या मीटिंग हॉलमध्ये तयारी करण्यात आली होती. यावेळी या सभागृहात निवडणूक कर्मचाऱ्यांसह व्हिडीओ कॅमेराची देखील व्यवस्था करण्यात आली होती. परंतु धनंजय बेळे यांच्यासह निवडणूक रिंगणातील काही उमेदवारांनी या फेरमतमोजणी प्रक्रियेसाठी हरकत घेतल्याने ही प्रक्रिया रद्द करण्यात आली.
तसेच धनंजय बेळे यांनी शुक्रवारी सकाळी सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांच्याविरुद्ध बेकायदेशीर फेरमतमोजणी घेण्यात येत असल्याची तक्रार भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल केल्याने
भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे यांनी तत्काळ सार्वजनिक वाचनालयाला भेट देत याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांच्यासह ग्रंथमित्र पॅनलचे उमेदवार भालचंद्र वाघ आणि जनस्थान पॅनलचे उमेदवार धनंजय बेळे यांचे म्हणणे ऐकून घेतले.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी फेरमतमोजणी प्रक्रिया रद्द झाल्याची माहिती देताना माधवराव भणगे यांनी मतमोजणीच्या दिवशी ‘मी केवळ उमेदवारांच्या मतांचे वाचन केले असून, अधिकृत निकाल जाहीर केलेला नाही’ असे सांगितल्याने सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणूक प्रक्रियेतील गुंता अधिकच वाढलेला असताना भणगे यांनी शुक्रवारी संध्याकाळी साडेचार वाजता निकालाची अधिकृत प्रत वाचनालयाचे काळजीवाहू अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांच्याकडे सुपूर्द केल्याने चार ते पाच तासांत कुठली चक्रे फिरली याबाबत चर्चा सुरू आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सकाळी विजयी उमेदवारांची
अधिकृत घोषण केली नसल्याचे म्हणणे आणि संध्याकाळी अध्यक्षांकडे अधिकृत निकालाची प्रत सुपूर्द करणे या घटनेमुळे निवडणूक निर्णय अधिकारी वेळोवेळी सोयीप्रमाणे भूमिका बदलत असून, या निवडणूक प्रक्रियेबद्दलचा संभ्रम अधिकच वाढला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The finalization process will be postponed for one month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.