...अखेर वसाकाचा बॉयलर पेटला

By Admin | Published: December 17, 2015 11:26 PM2015-12-17T23:26:31+5:302015-12-17T23:27:27+5:30

राहुल अहेर : ऊस उत्पादक, सभासद, कामगारांनी सहकार्य करावे

... finally boiled the boiler of the boiling water | ...अखेर वसाकाचा बॉयलर पेटला

...अखेर वसाकाचा बॉयलर पेटला

googlenewsNext

लोहोणेर : राज्य सहकारी बँकेच्या कर्जाचे पुनर्घटन करून राज्य शासनाचे हमीपत्र घेऊन गळीत हंगाम चालू करणारा ‘वसाका’ राज्यात एकमेव कारखाना ठरला असून होऊ घातलेला गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व ऊस उत्पादक, सभासद ,कामगारांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार डॉ. राहुल अहेर यांनी गुरुवारी (दि. १७) वसाकाच्या २९ व्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभप्रसंगी केले.
वसाकाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, उपाध्यक्ष सुहास कांदे, जिल्हा बँकेचे संचालक तथा जि.प. सभापती केदा अहेर, धनंजय पवार, नामदेव हलकंदर, कारखान्याचे प्राधिकृत अधिकारी जी. जी. मावळे, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक सुभाष देसले यांच्या प्रमुख उपस्थितीत व आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या अध्यक्षतेखाली झाला, यावेळी ते बोलत होते.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच वसाकाला सात कोटी रु पयांचे अल्पमुदतीचे कर्ज मंजूर केले असून त्यातील सव्वा कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत त्याबरोबरच वसाकाने मध्यम मुदतीच्या कर्जासाठी साडेचार कोटी रु पयांचा प्रस्ताव सादर केला असून त्याचीही पूर्तता करण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक मंडळ प्रयत्नशील राहील,अशी ग्वाही जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी यावेळी दिली. वसाकाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आगामी काळात जिल्हा बँकेसह राज्य शासनाकडे आपण पाठपुरावा करण्यास कटिबद्ध आहोत,अशी ग्वाही जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुहास कांदे यांनी यावेळी दिली. वसाकाला उर्जितावस्था मिळवून देणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून जिल्हा बँकेच्या माध्यमातून जो आशेचा किरण मिळालेला आहे त्याचा फायदा घेऊन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात चालू होणाऱ्या गळीत हंगामासाठी सर्व ऊस उत्पादकांनी वसाकालाच ऊस पुरवठा करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक तथा जि. प. सभापती केदा अहेर यांनी यावेळी केले.
यावेळी कारखान्याचे मुख्य प्राधिकृत अधिकारी जी. जी. मावळे, मविप्रचे माजी उपसभापती डॉ. विलास बच्छाव, माजी अध्यक्ष शशिकांत पवार, वसंत निकम आदिंनी कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी कारखान्याच्या कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे व भाऊसाहेब देशमुख यांच्या हस्ते सपत्नीक बॉयलरचे पूजन करण्यात आले. यावेळी वसाकाचे माजी संचालक नारायण पाटील, संतोष मोरे, मधुकर पगार, बाबूराव निकम, दादाजी पवार, शांताराम जाधव, आत्माराम भामरे, जि. प. सदस्य नितीन पवार, कौतिक महाराज पगार, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब अहेर, बाबासाहेब बच्छाव, रामदास देवरे, अण्णा पाटील शेवाळे, भरत पाळेकर, रामदास पाटील, संतोष सूर्यवंशी, प्रभाकर पाटील, भगवान पगार, दादाजी अहिरे, लोहोणेरचे माजी सरपंच दीपक बच्छाव, साहेबराव सोनवणे, देवळ्याचे उपनगराध्यक्ष अशोक अहेर, बाळासाहेब बिरारी, बापू देवरे, अभिमन पवार, दिनकर देवरे, फुला जाधव, कुबेर जाधव, डॉ. शशिकांत अहेर, भास्कर निकम, माणिक देवरे, राजेंद्र पवार, कडू पवार, भास्कर पवार, अशोक बोरसे, डॉ. प्रशांत निकम, अतुल पवार, दिलीप अहेर, प्रदीप अहेर आदिंसह ऊस उत्पादक, सभासद, कामगार व कारखान्याशी निगडित असलेले सर्व घटक मोठ्या संख्येने हजर होते.
कार्यक्र माचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक बी. डी. देसले यांनी केले, तर आभार कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे यांनी मानले. जानेवारीच्या पहिल्या सप्ताहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वसाकाच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात येणार असून उशिराने चालू होणाऱ्या गळीत हंगामामुळे जिल्हा बँकेचे कर्ज फेडता येणार आहे, तसेच राज्य सहकारी बँकेच्या कर्जाच्या व्याजाची परतफेड करून वीजनिर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून मिळणारी सबसिडी व आदिवासी उपयोजनेतील आदिवासी सभासदांच्या भागभांडवलासाठी दीड कोटी रु पये कारखान्याला प्राप्त होणार असल्यानेच यावर्षी गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला
आहे.
वसाकाचा चालू गळीत हंगाम यशस्वी करण्याबरोबरच व्यावसायिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून वीजनिर्मिती तसेच आसवानी प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्याचा आमचा मानस आहे. जी. जी. मावळे , मुख्य प्राधिकृत अधिकारी, वसाका. चौकट : वर्तमानपत्रातून दिलेल्या बातमीच्या आधारावर वसाकाच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभास कार्यक्षेत्रातील सर्व माजी संचालक, ऊस उत्पादक, सभासद, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने वसाकाच्या याअगोदरच्या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभांनाही एवढी गर्दी झाली नव्हती एवढी गर्दी पहावयास मिळाली. यावरून वसाकाविषयी असलेली जनतेची आत्मीयता यावेळी प्रामुख्याने दिसून आली. (वार्ताहर)

Web Title: ... finally boiled the boiler of the boiling water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.