डाबली शिवारात अखेर वनविभागाकडून पिंजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2021 10:52 PM2021-11-28T22:52:24+5:302021-11-28T22:52:55+5:30
वडनेर : मालेगाव तालुक्यातील डाबली शिवारात बिबट्याने एका आठवड्याच्या अंतराने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दोन गाईंवर हल्ला करून त्या ...
वडनेर : मालेगाव तालुक्यातील डाबली शिवारात बिबट्याने एका आठवड्याच्या अंतराने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दोन गाईंवर हल्ला करून त्या ठार केल्या होत्या. वनविभागाच्या माध्यमातून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.
डाबली शिवारातील प्रवीण हिरे व विश्वास व्याळीज या दोन शेतकऱ्यांच्या गोठ्यावर हल्ला करून बिबट्याने दोन गाई ठार केल्या होत्या. दोन्ही घटना आठवड्याच्या अंतराने झाल्याने शेतकरीवर्गात बिबट्याची दहशत पसरली आहे. शेतमजूर कामावर येण्यावरही परिणाम झाला आहे. गावकरी तसेच शेतशिवारातून शाळेत जाणारे विदयार्थी बिबट्याच्या दहशतीत असल्याने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली होती. यासाठी डाबलीचे सरपंच एकनाथ भोसले यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने वनविभागास निवेदन सादर करून बिबट्याच्या बंदोबस्तासाठी तत्काळ पिंजरा लावण्याची मागणी केली होती. शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला असला तरी बिबट्याची दहशत कायम आहे.