...अखेर ‘कॅट्स’मधील बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 11:40 PM2020-02-29T23:40:09+5:302020-02-29T23:43:22+5:30

नाशिक : गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल (कॅट्स)च्या हेलिकॉप्टर उड्डाणाच्या धावपट्टीपासून अगदी दीडशे ते दोनशे मीटर अंतरावर असलेल्या गवताळ भागात वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात शनिवारी (दि.२९) सकाळी बिबट्या जेरबंद झाला.

... finally the cats in the cats | ...अखेर ‘कॅट्स’मधील बिबट्या जेरबंद

...अखेर ‘कॅट्स’मधील बिबट्या जेरबंद

Next
ठळक मुद्देवनविभागाने लावला होता ‘ट्रॅप’

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल (कॅट्स)च्या हेलिकॉप्टर उड्डाणाच्या धावपट्टीपासून अगदी दीडशे ते दोनशे मीटर अंतरावर असलेल्या गवताळ भागात वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात शनिवारी (दि.२९) सकाळी बिबट्या जेरबंद झाला.
या भागात बिबट्यासारख्या वन्यजिवांचा वावर असल्याच्या तक्रारी वारंवार संबंधित लष्करी अधिकाऱ्यांकडून नाशिक पश्चिम वनविभागाकडे पत्रांद्वारे केल्या जातात. असेच एक पत्र सोमवारी (दि.१०) वनविभागाला कॅट्सकडून प्राप्त झाले होते. या पत्राची दखल घेत वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, वनपाल मधुकर गोसावी, उत्तम पाटील आदींनी कॅट्सच्या परिसरात भेट देत पाहणी करून बिबट असल्याची खात्री पटविली. यानंतर बुधवारी (दि.१२) वनकर्मचाºयांनी या भागात पिंजरा तैनात केला.
दररोज वनकर्मचाºयांकडून या पिंजºयाबाबतची माहिती कॅट्समधील कर्मचाºयांकडून जाणून घेतली जात होती. तसेच दोन ते तीन दिवसांनंतर वनरक्षक पाटील हे पिंजरा लावलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करत होते. पिंजºयात बिबट्या जेरबंद होत नव्हता.


त्यामुळे त्यांनी या भागात पाहणी करून बिबट्याच्या संचाराच्या पाऊलखुणांद्वारे माग काढला आणि काही दिवसांपूर्वी त्यांनी पिंजºयाची जागा बदलली. कॅट्सच्या पोस्ट क्रमांक-१ आणि हेलिकॉप्टरच्या हॅँगर या दोघांमधील मोकळ्या भागातील गवताने वेढलेल्या परिसरात पिंजरा लावण्यात आला. या पिंजºयात शनिवारी मध्यरात्री बिबट्या अडकला. सकाळी ७ वाजेच्या सुमारास कॅट्समधून वनकर्मचाºयांना बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावण्यात आलेल्या पिंजºयाचा दरवाजा खाली पडल्याची माहिती देण्यात आली. तत्काळ वनाधिकारी व कर्मचाºयांनी घटनास्थळ गाठत खात्री केली असता बिबट्या पिंजºयात जेरबंद झालेला होता. तत्काळ वन्यप्राणी रेस्क्यू वाहनाद्वारे बिबट्याला पिंजºयातून वनविभागाने कॅट्समधून गंगापूर धरणालगतच्या वनविभागाच्या रोपवाटिकेत हलविले.चार बिबट्यांचा संचार?
कॅट्सच्या परिसरात जंगल अधिक असून, मानवी हस्तक्षेपदेखील नसल्यामुळे या भागात किमान चार बिबटे मुक्तपणे संध्याकाळनंतर पहाटेपर्यंत संचार करत असल्याची बाब लष्करी अधिकाºयांकडून नाशिक पश्चिम वनविभागाला लेखी स्वरूपात कळविण्यात आली आहे.

Web Title: ... finally the cats in the cats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.