...अखेर 'त्या' गोळीबार 'नाट्य'वरील पडदा उघडला; कर्जबाजारीतून मार्ग काढण्याचा 'प्रयोग'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:26 PM2021-02-27T16:26:54+5:302021-02-27T16:27:32+5:30

कर्जबाजारी झाल्याने स्वप्निलकडे पैशांसाठी लोक तगादा लावत होते. यामधुन सुटका करुन घेण्यासाठी स्वप्निलने स्वत:कडील बेकायदेशीर पिस्तुलमधून वाहनावर गोळीबार केला आणि प्राणघातक हल्ला झाल्याचा बनाव रचला.

... Finally, the curtain fell on the drama of that shooting; the 'experiment' of finding a way out of debt. | ...अखेर 'त्या' गोळीबार 'नाट्य'वरील पडदा उघडला; कर्जबाजारीतून मार्ग काढण्याचा 'प्रयोग'

...अखेर 'त्या' गोळीबार 'नाट्य'वरील पडदा उघडला; कर्जबाजारीतून मार्ग काढण्याचा 'प्रयोग'

googlenewsNext
ठळक मुद्देस्वप्नील दंडगव्हाळसह तीघे ताब्यात

नाशिक : मुंबईआग्रा महामार्गावरील वाडीवऱ्हे पोलीस ठाणे हद्दीतील रायगडनगर येथील एका वळणावर गुरुवारी मध्यरात्री नाट्य कलावंत स्वप्नील गायकवाड यांच्यावर दुचाकीने आलेल्या दोघा हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली होती. याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात दंडगव्हाळ यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा पोलिसांनी दाखल केला. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरु असताना या गोळीबार 'नाट्य'वरील पडदा अखेर उघडला. दंडगव्हाळ यांनी स्वत: कर्जबाजारीला कंटाळून त्यामधून मार्ग काढण्यासाठी 'प्रयोग' केल्याचे शनिवारी निष्प्नन्न झाले.

याबाबत ग्रामिण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शहरातील कॉलेजरोड भागात राहणारे दंडगव्हाळ हे त्यांच्या कामानिमित्त मित्राची ॲसेंट कार (एमएच १५ ईपी १४३४) घेऊन ठाणे येथे गुरुवारी (दि२५) येथे गेले होते. कामकाज आटोपून नाशिककडे परतत असताना त्यांनी जेवणासाठी रायगडनगर येथे वाहन थांबविले. जेवण आटोपून पुन्हा नाशिककडे येत असताना दुचाकीने आलेल्या अज्ञात दोघा हल्लेखोरांनी पिस्तुलमधून त्यांच्या वाहनावर गोळ्या झाडल्याची फिर्याद त्यांनी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात दिली. पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर अधीक्षक शर्मिला वालावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेला सखोल तपास करत तातडीने गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश दिले. पोलीस निरिक्षक राजेंद्र कुटे, समीर अहिरराव, अनिल वाघ, नवनाथ गुरुळे, हेमंत गिलबिले, रवींद्र वानखेडे आदिंच्या पथकाने तपासाला गती दिली. संशयावरुन स्वप्नील यांना प्रथम चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

यावेळी घटनाक्रम आणि त्यांनी सांगितलेली हकिगत यामध्ये तफावत आढळून आली. यामुळे पोलीसांचा संशय अधिकच बळावला. स्वप्नील यास पोलिसांनी 'खाक्या'दाखवत कसून चौकशी केली असत, त्याने गुन्ह्याची कबुली देत स्वत: रात्री दीड वाजेच्या सुमाारास कारच्या काचेवर गोळीबार केल्याचे सांगून या नाट्याचा प्रयोग संपविला.

---इन्फो---
'गोळीबार'मधील सहकलाकारही ताब्यात

कर्जबाजारी झाल्याने स्वप्निलकडे पैशांसाठी लोक तगादा लावत होते. यामधुन सुटका करुन घेण्यासाठी स्वप्निलने स्वत:कडील बेकायदेशीर पिस्तुलमधून वाहनावर गोळीबार केला आणि प्राणघातक हल्ला झाल्याचा बनाव रचला. संशयित स्वप्नील यास या 'गोळीबार' नाट्यात साथ देणारे संशयित केशव संजय पोतदार (२५, रा. सिध्दीविनायक सोसा. इंदिरानगर) व रौनक दीपक हिंगणे (३१, रा. गुरुद्वारा रोड, शिंगाडा तलाव) आणि आसिफ आमिन कादरी (३५, रा. मोठा राजवाडा, जुने नाशिक) यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील केशव आणि रौनक यांना घटनास्थळी बोलावून स्वप्नील याने गुन्ह्यात वापरलेले बेकायदेशीर पिस्तुल दिले. तर केशव याने हे पिस्तुल लपविण्यासाठी आसिफकडे दिल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. या तीघांविरुध्द गुन्हा दाखल करुन त्यांना पुढील तपासाकरिता वाडीवऱ्हे पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

Web Title: ... Finally, the curtain fell on the drama of that shooting; the 'experiment' of finding a way out of debt.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.