अखेर हिरे - गायकवाड यांचे मनोमिलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2021 11:08 PM2021-11-07T23:08:31+5:302021-11-07T23:08:51+5:30
मालेगाव : गेल्या अनेक दिवसांपासून मतभेदांमुळे भाजपापासून दूर गेलेले युवा नेते अद्वय हिरे आणि भाजपा गटनेते सुनील गायकवाड यांचे मनोमिलन झाले असून, आगामी सर्वच निवडणुका एकदिलाने लढविण्याचा मनोदय दोघांनीही जाहीर केला.
मालेगाव : गेल्या अनेक दिवसांपासून मतभेदांमुळे भाजपापासून दूर गेलेले युवा नेते अद्वय हिरे आणि भाजपा गटनेते सुनील गायकवाड यांचे मनोमिलन झाले असून, आगामी सर्वच निवडणुका एकदिलाने लढविण्याचा मनोदय दोघांनीही जाहीर केला.
ओबीसी आघाडीचे दीपक पवार यांच्या मध्यस्थीचे जळगाव येथे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यात सुनील गायकवाड आणि अद्वय हिरे यांना समोरासमोर बसवून त्यांच्यातील मतभेद दूर करण्यात आले. गेल्या निवडणुकीपासून अद्वय हिरे भाजपापासून काही काळ दूर होते. आता त्यांनी भाजप ह्यपक्षह्ण सोडलेला नव्हता. आता त्यांनी सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. नियोजित मालेगाव जिल्ह्यातील भाजपाची धुरा अद्वय हिरे सांभाळतील. निवडणुकांची जबाबदारीही त्यांच्यावरच टाकण्यात आली.
आगामी महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समितीसह सर्व निवडणुका अद्वय हिरे यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जातील. हिरे सक्रिय झाल्यामुळे पक्ष बळकट होणार असून, तालुक्यातील राजकारणात शिवसेनेसमोर तगडे आव्हान उभे ठाकणार आहे. मनपा, बाजार समिती, पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात असून, कृषिमंत्री दादा भुसे यांचे वर्चस्व आहे. मात्र, गायकवाड - हिरे एकत्र आल्याने भाजपातील मरगळ झटकली जाणार आहे. त्यांच्या सक्रियतेमुळे राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. तालुक्यातील एकहाती सत्तेला ह्यआव्हानह्ण मिळणार आहे. बैठकीस माजी मंत्री गिरीश महाजन, दीपक पवार, आमदार जयकुमार रावल उपस्थित होते.