..अखेर बेपत्ता शुभम सुखरूप घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 12:06 AM2019-12-24T00:06:31+5:302019-12-24T00:07:37+5:30

आई रागावल्याचा रोग मनात धरून घरातून निघून गेलेला इयत्ता सातवीमध्ये शिकणारा शुभम अंदरसूलच्या शिवसैनिकांच्या सतर्कतेमुळे सुखरूप घरी पोहोचला आहे. त्याला पाहताच पालकांनी आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली.

.. finally disappearing auspiciously at home | ..अखेर बेपत्ता शुभम सुखरूप घरी

..अखेर बेपत्ता शुभम सुखरूप घरी

Next
ठळक मुद्देयेवला : आई रागावल्याने सोडले होते घर

येवला : आई रागावल्याचा रोग मनात धरून घरातून निघून गेलेला इयत्ता सातवीमध्ये शिकणारा शुभम अंदरसूलच्या शिवसैनिकांच्या सतर्कतेमुळे सुखरूप घरी पोहोचला आहे. त्याला पाहताच पालकांनी आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली.
मूळचे नाशिक येथील पवननगरमध्ये राहणारे अशोक बापू पाटील (ह.मु. शिंप्पी गल्ली, येवला) हे कामानिमित्ताने येवल्यात स्थायिक झाले आहेत. नेहमीप्रमाणे कामानिमित्त वडील घराबाहेर गेल्यानंतर शुभम व त्याची आई मंगल घरात होत्या. काहीतरी कारणावरून आई शुभमला रागावली. याचा राग येऊन शुभमने थेट फत्तेबुरु ज नाका गाठला. डोक्यात राग असल्याने शुभमने अंदरसूलच्या दिशेने जाणाऱ्या अनोळखी मोटारसायकलस्वारास हात दिला. अंगात शाळेचा ड्रेस असल्याने मुलगा शाळेत चालला असावा म्हणून दुचाकीस्वारास शंका आली नाही. मात्र, अंदरसूल येथे
पोहोचल्यानंतर आपण चूक करत असल्याची भवना शुभमच्या मनात आली. घरी आईवडील वाट पाहतील असा विचार डोक्यात आल्याने त्याने दुचाकीस्वारास मला येथेच सोडून द्या, अशी विनंती केली. अंदरसूल बस थांबा येथे उतरल्यानंतर भुकेने व घरच्या धाकाने शुभम रडू लागला. तोच अंदरसूल येथील शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख झुंजार देशमुख यांनी जवळच असलेल्या एका हार्डवेअरच्या दुकानात नेऊन त्याची विचारपूस केली. यानंतर त्यास जेवण देत त्याच्या पालकांची चौकशी केली. येवल्यात नव्यानेच रहायला आल्याने व आधीच घाबरलेल्या शुभमला नीट माहिती सांगता येत नव्हती.
सोशल मीडियामुळे लागला शोध
देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी समयसूचकता दाखवत सोशल मीडियावर शुभमचे फोटो व त्याच्याकडून मिळालेली माहिती पोस्ट केली. तसेच येवला तालुका पोलिसांना या घटनेची माहिती दिली. काही समाजसेवक व सोशल मीडियाच्या माध्यमातून हरवलेला मुलगा शुभम अशोक पाटील हा येवल्यातून घर सोडून गेला आहे याची माहिती समोर आली. त्यानंतर देशमुख यांच्यासह पोलिसांनी अंदरसूल येथून शुभमला सुखरूप ताब्यात घेऊन त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले.

Web Title: .. finally disappearing auspiciously at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.