अखेर वैद्यकीय महाविद्यालयाची स्वप्नपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:17 AM2021-02-11T04:17:23+5:302021-02-11T04:17:23+5:30

नाशिक: राज्याच्या आरोग्य शिक्षणाची जबाबदारी सांभाळणारे आरेाग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकस्थित असतानाही, नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने याबाबतची खंत वारंवार ...

Finally the dream of a medical college | अखेर वैद्यकीय महाविद्यालयाची स्वप्नपूर्ती

अखेर वैद्यकीय महाविद्यालयाची स्वप्नपूर्ती

Next

नाशिक: राज्याच्या आरोग्य शिक्षणाची जबाबदारी सांभाळणारे आरेाग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकस्थित असतानाही, नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने याबाबतची खंत वारंवार व्यक्त केली जात होती. अखेर प्रदीर्घ कालावधीनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तसेच त्याच्याशी संलग्न ४३० खाटांचे रुग्णालयास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याने नाशिकमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाची स्वप्नपूर्ती झाली आहे.

नाशिकमध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठ आल्यानंतर, प्रत्यक्षात विद्यापीठ स्थिरस्थावर होण्यास सुरुवातीची काही वर्षे गेली. त्यानंतर नाशिकमध्येही वैद्यकीय महाविद्यालय असावे, अशी चर्चा सुरू झाली आणि विद्यापीठांचे आजवरचे कुलगुरू, तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री, पालकमंत्र्यांनी यासाठीची पावले उचलली, परंतु नाशिकला महाविद्यालय होण्याची प्रक्रिया अनेकविध कारणांने मागे पडत गेली. नाशिकमध्ये डॉ. डी. एस. आहेर यांच्याकडे आरोग्यमंत्री पद असताना आयएमएसारख्या संस्थेनेही यासंबंधीचा प्रस्ताव दिला होता. परंतु पुढे त्याला मूर्त स्वरूप लाभू शकले नाही.

दरम्यान, गेल्या दहा वर्षांपासून याबाबतच्या प्रयत्नांना आणखी गती देण्यात आली. तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित, जितेंद्र आव्हाड, गिरीश महाजन यांनी या विषयाला काही प्रमाणात चालना दिल्याने प्रकरण पुढे सरकले. अर्थात, त्यानंतरही नाशिकचा विषय मागे पडून नंदुरबार आणि जळगावमधील वैद्यकीय महाविद्यालय आकारास आले. त्यामुळे नाशिकच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या भवितव्याबाबत चर्चा सुरू होती. नाशिकला वैद्यकीय महाविद्यालय दृष्टिपथात येत नसल्याने, निदान पदव्युत्तर महाविद्यालयाबाबतची चर्चा सुरू झाली आणि संदर्भ सेवा रुग्णालयाला संलग्न पदव्युत्तर शिक्षणासाठीच्या जागा देण्याचे प्रयत्न सुरू झाले.

जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी नाशिकला वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक पावले उचलत असल्याचे संकेत अनेकदा दिले होते. भुजबळ यांनी याबाबतची मागणी सातत्याने केली आणि अखेर बुधवारी (दि.१०) नाशिकच्या वैद्यकीय महाविद्यालयाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

--इन्फो--

विद्यापीठ आवारातच महाविद्यालय शक्य

नाशिकला वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय यासाठी ६२७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. विद्यापीठाची ५५ एकर जागा असून, वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी २० एकर जागेचा निकष आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या आवारातच महाविद्यालय सुरू होऊ शकते.

....

आरोग्य विद्यापीठाच्या प्रवेशव्दाराचा फोटो वापरावा.

Web Title: Finally the dream of a medical college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.