खड्डे बुजविण्यासाठी अखेर मिळाला मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 12:53 AM2018-07-02T00:53:32+5:302018-07-02T00:54:00+5:30
पांडाणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्याने नाशिक-वणी रस्त्याची दैना मिटली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाला या मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी मुहूर्त मिळाला आहे.
पांडाणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्याने नाशिक-वणी रस्त्याची दैना मिटली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाला या मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी मुहूर्त मिळाला आहे.
नाशिक-वणी रस्त्यावर ओझरखेड कॉलनी ते देशमुख बाबांचा मळा व लखमापूर फाटा ते आवनखेड नदी पूलापर्यंत रस्ता उखडला गेला असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीकडे सतत दुर्लक्ष केले. सोमवारी (दि. २) सप्तश्रृंगगडावर फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याचे जाहीर होताच संबंधित विभागाने युद्धपातळीवर रस्ता डागडुगीचे काम हाती घेतले आहे. उन्हातान्हाची पर्वा न करता बांधकाम विभागाचे अधिकारी स्वत: उभे राहून खड्डे बुजविणे, गतिरोधकावर पांढरे पट्टे मारण्याचे काम करून घेताना दिसत आहे.
आवनखेड पुलापासून लखमापूर फाट्यापर्यंत छोट्या-मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती. खड्डे वाचवण्याच्या नादात अनेकवेळा अपघातही झाले आहेत. वणी-नाशिक रस्ता मृत्यूचा सापळा बनला होता. मुख्यमंत्र्यांच्या दौºयामुळे का होईना सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आल्याने वाहनचालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.