अखेर ऑक्सिजन प्लांटला महापालिकेचा हिरवा कंदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:23 AM2021-05-05T04:23:14+5:302021-05-05T04:23:14+5:30

गेल्या तीन वर्षांपासून अंबड औद्योगिक वसाहतीत ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी मनपाचा नगररचना विभाग परवानगी देण्यासाठी टाळाटाळ करीत होता. ...

Finally, the green light of the municipal corporation to the oxygen plant | अखेर ऑक्सिजन प्लांटला महापालिकेचा हिरवा कंदिल

अखेर ऑक्सिजन प्लांटला महापालिकेचा हिरवा कंदिल

Next

गेल्या तीन वर्षांपासून अंबड औद्योगिक वसाहतीत ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी मनपाचा नगररचना विभाग परवानगी देण्यासाठी टाळाटाळ करीत होता. नाशिक शहरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर नाशिक शहरामध्ये ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत असल्याने ऑक्सिजन न मिळाल्याने बऱ्याच बाधित नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी अंबड, तसेच सातपूर औद्योगिक वसाहतीत उद्योजकांना ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावे असे आवाहन केले होते. मात्र, गेल्या तीन ते चार वर्षांपासून ऑक्सिजन प्लांटसाठी सर्व कागदपत्रे मनपा नगररचना विभागात सादर करूनदेखील ऑक्सिजन व इतर गॅस रिफिलिंग प्लांट लावण्यासाठी परवानगी देण्यास टाळाटाळ करीत असल्याने उद्योजक साहेबराव दातीर यांनी मनपाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितल्यानंतर अखेरीस मनपाच्या नगररचना विभागाने प्लांट उभारण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. मनपा अधिकारी संजय अग्रवाल व त्यांच्या टीमने अंबड औद्योगिक वसाहतीत दातीर यांच्या मालकीच्या जागेची पाहणीदेखील केली.

कोट===

अंबड औद्योगिक वसाहतीत अंबड गावालगत १२०० वारचा प्लाट आहे. या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी मनपाने परवानगी दिली असून, लवकरच या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारण्यास सुरुवात करणार आहे.

-साहेबराव दातीर, उद्योजक

Web Title: Finally, the green light of the municipal corporation to the oxygen plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.