...अखेर जाखोरीमध्ये बिबट्या जेरबंद; दारणाकाठाला मोठा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 11:05 PM2020-07-02T23:05:06+5:302020-07-02T23:09:21+5:30
मागील दोन महिन्यांत बिबट्याच्या हल्ल्यात चौघांचा बळी दारणाकाठावरील हिंगणवेढे, बाभळेश्वर, दोनवाडे या गावांमध्ये गेला तर तीघे सुदैवाने बचावले.
नाशिक : दारणानदीकाठालगतच्या पंचक्रोशीत मागील महिनाभरापासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याने गावकऱ्यांमध्ये भीती व्यक्त होत होती. जाखोरी गावात अखेर गुरूवारी (दि.२) रात्री दहा वाजेच्या सुमारास एक प्रौढ बिबट्यावनविभागाने लावलेल्या पिंजºयात जेरबंद झाला. या गावापासून जवळच असलेल्या बाभळेश्वरमध्ये काही दिवसापुंर्वीच बिबट्याच्या हल्ल्यात एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. जाखोरीत जेरबंद झालेल्या बिबट्यामुळे काही प्रमाणात दारणाकाठाच्या गावांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
बारामाही वाहणा-या दारणा-गोदावरी नदीचे प्रशस्त खोरे आणि नगदी पीक ऊसाची विस्तीर्ण लागवड यामुळे बिबट्यांना या भागातील गावांमध्ये पोषक असे वातावरण मिळाले आणि बिबट्यांची संख्या वाढू लागल्याचे निदर्शनास आले. मागील दोन महिन्यांत बिबट्याच्या हल्ल्यात चौघांचा बळी दारणाकाठावरील हिंगणवेढे, बाभळेश्वर, दोनवाडे या गावांमध्ये गेला तर तीघे सुदैवाने बचावले. यामुळे या भागातील गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप अन् भीतीचे वातावरण तयार झाले होते. मागील दोन महिन्यांपासून नाशिक पश्चिम वनविभागाचे बचावपथक दिवसरात्र एक करून विविध उपाययोजना राबवित बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अखेर वनविभागाच्या प्रयत्नांना गुरूवारी रात्री जाखोरीत यश मिळाले. दोन दिवसांपुर्वी येथील शेतकरी बबलू सय्यद यांच्या गट क्रमांक २८५मध्ये वनपाल मधुकर गोसावी, वनरक्षक गोविंद पंढरे, रेस्क्यू वाहनचालक प्रवीण राठोड, इको-एको वन्यजीव संस्थेचे स्वयंसेवक यांनी स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार बिबट्याचा माग काढत पिंजरा दोन दिवसांपुर्वी पिंजरा लावला होता. वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनीही पाहणी करून पिंजºयाची जागा योग्य असून यामध्ये बोकड सावज ठेवण्याची सुचना केली होती. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली आणि अखेर जाखोरी गावात वनविभागाला अथक परिश्रमानंतर बिबट्याला जेरबंद करण्यास यश आले.
गावक-यांची भरली जत्रा
जाखोरी गावात बिबट्या जेरबंद झाल्याची बातमी पंचक्रोशीत वाºयासारखी पसरली. पिंजºयात आलेला बिबट्या बघण्यासाठी आजुबाजुच्या लोकवस्तीवरील गावकºयांनी एकच धाव घेतली. यामुळे जणू या शेतात रात्रीच्या वेळी बघ्यांची जत्रा भरल्याचे चित्र होते. बिबट्याचा पिंजरा तत्काळ रेस्क्यू वाहनातून शासनाच्या रोपवाटिकेत हलविण्यात आला.
--वनविभाग त्यांच्यापरीने सर्वच उपाययोजना आणि प्रयत्न करत आहेत. गावक-यांनी आपल्या सुरक्षेसाठी अधिक खबरदारी घ्यावी. या भागात तीन नव्हे तर चार पथके सातत्याने तळ ठोकून आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, केवळ संध्याकाळनंतर घराबाहेर पडू नये, आणि बिबट्याकडून संभाव्य मनुष्यहानी रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. जाखोरी गावात पुन्हा नव्याने दुसरा पिंजराही तत्काळ लावण्यात आला आहे.
-शिवाजी फुले, उपवनसंरक्षक