अखेर मनपा कर्मचाऱ्यांना मिळाले वेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 12:57 AM2019-10-08T00:57:30+5:302019-10-08T00:57:50+5:30
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरीच्या आधारे वेतन देण्याचा तिढा अखेर सुटला असून, सणासुदीच्या तोंडावर नाराजी टाळण्यासाठी वेतन देण्यास प्रारंभ झाला आहे.
नाशिक : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरीच्या आधारे वेतन देण्याचा तिढा अखेर सुटला असून, सणासुदीच्या तोंडावर नाराजी टाळण्यासाठी वेतन देण्यास प्रारंभ झाला आहे. तीन हजार कर्मचाºयांना सोमवारी (दि.७) वेतन देण्यास प्रारंभ झाला. तर बुधवार (दि.९) पासून सानुग्रह अनुदान देण्यास प्रारंभ होणार आहे. त्यामुळे कर्मचाºयांना दिलासा मिळाला आहे.
महापालिकेचे पाच हजार कर्मचारी असून, त्यांना बायामेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. या कर्मचाºयांचे वेतन बायोमेट्रिक हजेरीच्या आधारे करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. मात्र कर्मचाºयांच्या जाण्या-येण्याच्या वेळा निश्चित नाहीत. अनेकांना क्षेत्रीय कामासाठी अधिक वेळ द्यावा लागतो. महापालिकेच्या पदाधिकाºयांकडे काम करणाºयांना तर शहराच्या बाहेरदेखील कामानिमित्त नेले जाते. त्यामुळे बायोमेट्रिक हजेरीत अनेक वेळा बसत नाही. त्यामुळे प्रशासनाने तांत्रिकपूर्तता करावी, अशी कर्मचाºयांची मागणी आहे. तथापि, आयुक्तांनी गत महिन्याचे वेतनदेखील बायोमेट्रिक हजेरीच्या आधारे करण्याचे आदेश दिल्यानंतरदेखील तीनशे साडेतीनशे कर्मचाºयांमुळे सर्वांचेच वेतन रखडले होते. मात्र त्यानंतर कर्मचाºयांची सणासुदीच्या काळातील नाराजी दूर करण्यासाठी आयुक्तांनी सोमवारी (दि.७) वेतन अदा करण्याचे आदेश दिल्यानंतर त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तर बुधवारी (दि.९) उर्वरित कर्मचाºयांचे वेतन अदा होईल आणि त्याचदिवशी सर्वांचे सानुग्रह अनुदानदेखील वितरित करण्यात येणार आहे.