अखेर नाशिक रेड झोनमधून बाहेर; 1 जूननंतर निर्बंध शिथील हेाण्याची शक्यता, पालकमंत्री भुजबळ यांचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 04:05 PM2021-05-29T16:05:54+5:302021-05-29T16:07:06+5:30
नाशिक जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. नाशिक जिल्ह्यात २० मे रोजी १७ हजार रूग्ण उपचार घेत होते. त्यात आता घट झाली आहे. जिल्हा पातळीवर बारा दिवस कडक निर्बंध पाळण्यात आल्याने आता सध्या पाच हजार रूग्णच शहरात उपचार घेत आहेत.
नाशिक- जिल्ह्यात केारोना बाधीतांची संख्या घटली असून पॉझीटीव्हीटी रेट दहाच्या आत आल्याने धोकादायक रेड झोनमधून नाशिक जिल्हा बाहेर पडला आहे. त्यामुळे १ जूनपासून नाशिक जिल्ह्यातील निर्बंध शासनाकडून शिथील होण्याचे संकेत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. नाशिक जिल्ह्यात २० मे रोजी १७ हजार रूग्ण उपचार घेत होते. त्यात आता घट झाली आहे. जिल्हा पातळीवर बारा दिवस कडक निर्बंध पाळण्यात आल्याने आता सध्या पाच हजार रूग्णच शहरात उपचार घेत आहेत. तसेच पॉझीटीव्हीटी रेटही कमी झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने घोषीत केलेल्या रेड झोन जिल्ह्यांतून नाशिक जिल्हा बाहेर पडल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना काळात ऑक्सीजन टंचाई जाणवल्याने आता कोरोनाच्या बाबतीत नाशिक जिल्हा स्वयंपूर्ण होत आहे. जिल्ह्यात ५५ ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांचे काम सुरू आहे. केंद्र शासन आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या सीएसआरमधून त्यासाठी निधी मिळाला आहे. याशिवाय ७० मेट्रीक टन ऑक्सीजन निर्मितीची क्षमता असलेले कारखाने सध्या नाशिक जिल्ह्यात येत आहेत. राज्य सरकारकडून अशा प्रकल्पांना मदत करण्यात येईल, असेही भूजबळ यांनी सांगितले.
#coronavirus#Nashik@ChhaganCBhujbalhttps://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/QJhfvAacYo
— Lokmat (@MiLOKMAT) May 29, 2021म्युकरमायकोसिस बाबत गांभीर्याने उपाय सुरू आहेत. आत्तापर्यंत ३३८ रग्ण आढळले असून २१ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. म्युकरमायकोसिससाठी शस्त्रक्रीया करावी लागत असल्याने सहा ऑपरेशन थिएटर तयार करण्याचे काम सुरू आहेत, असेही भुजबळ यांनी सांगितले.