...अखेर बछडे मादीच्या कुशीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 12:32 AM2018-12-04T00:32:48+5:302018-12-04T00:34:30+5:30

सिन्नर : मातेपासून विलग झालेल्या बछड्यांची आईशी भेट घडवून आणण्याचे वनविभागाचे प्रयत्न रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास फळास आले. तालुक्यातील सांगवी शिवारातील शरद घुमरेयांच्या उसाच्या शेतात शनिवारी दुपारी साडेबारा वाजेला ऊसतोड कामगारांना चार बछडे आढळून आले होते.

 ... finally, in the neck of the barren woman | ...अखेर बछडे मादीच्या कुशीत

...अखेर बछडे मादीच्या कुशीत

Next
ठळक मुद्दे मादी व बछड्यांची भेट झाल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला.

सिन्नर : मातेपासून विलग झालेल्या बछड्यांची आईशी भेट घडवून आणण्याचे वनविभागाचे प्रयत्न रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास फळास आले. तालुक्यातील सांगवी शिवारातील शरद घुमरेयांच्या उसाच्या शेतात शनिवारी दुपारी साडेबारा वाजेला ऊसतोड कामगारांना चार बछडे आढळून आले होते.
वनविभागाने शेताच्या शेजारी क्रेटमध्ये हे बछडे ठेवले होते. रविवारी पहाटे बिबट्या मादी बछड्यांच्या शोधार्थ बाहेर पडली. त्यांना अलगद उचलून उसाच्या शेतात गेली. तब्बल १७ तासांनी बिबट्याची मादी व बछड्यांची भेट झाल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला.
बछड्यांना स्वीकारले नाही तर मादी किमान पिंजºयात तरी येईल, असा कयास बांधला गेला. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे, वनपाल अनिल साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक शरद थोरात, के.आर. इरकर, तानाजी भुजबळ, एम.व्ही. शिंदे यांनी घटनास्थळी तळ ठोकून होते. रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास बछड्यांच्या क्रेटजवळ आलेल्या मादीने त्यांना उचलल्यानंतर उसाच्या शेतात घेऊन गेली. मायलेकरांची तब्बल १७ तासांनी भेट घडवून आणल्याचे समाधान वनविभागासह स्थानिक रहिवाशांच्या चेहºयावर झळकत होते. ऊसतोड कामगारांना आढळले बछाडेसांगवी येथील शरद घुमरे यांच्या शेतात दोन दिवसांपूर्वी ऊसतोड कामगारांना आढळलेल्या बछड्यांना जास्त हाताळले, त्याचबरोबर मानवी स्पर्श झाला तर मादी त्यांना स्वीकारणार नाही. शिवाय बछड्यांच्या शोधार्थ बाहेर पडलेल्या बिबट्याच्या मादीस पिले आढळून न आल्यास ती अधिक आक्रमक झाली असती, अशी भीती वनविभागाच्या अधिकाºयांना व्यक्त होती. त्यांनी ऊसतोड कामगारांकडून ही बछडे ताब्यात घेत त्यांना अलगत प्लॅस्टिकच्या क्रे टमध्ये ठेवले. थंडीच्या कडाक्यात त्यांना ऊब मिळावी यासाठी क्रेटच्या भोवती पाचट ठेवण्यात आले होते. शिवाय जवळ पिंजराही लावण्यात आला होता.

Web Title:  ... finally, in the neck of the barren woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.