अखेर ती भिंत पाडण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 11:21 PM2021-03-30T23:21:30+5:302021-03-31T01:10:53+5:30
सटाणा : शहरातील मालेगाव रस्त्यावरील श्री समर्थ सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या कॉलनी रोडवर बांधलेली भिंत पाडू नये, याबाबत असलेला तात्पुरता ताकीद आदेश न्यायमूर्ती विक्रम आव्हाड यांनी उठवला असून, नगर परिषदेला दिलेला स्थगिती आदेश कायम करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळल्यामुळे संस्थेच्या कॉलनी रोडच्या उत्तर बाजूस रस्त्यावर बांधलेली भिंत पाडून टाकण्याचा नगर परिषदेचा मार्ग मोकळा झाला आहे.

सुमारे ४ वर्षांपूर्वी सटाणा शहरातील काही नागरिकांनी एकत्र येऊन श्री समर्थ गृहनिर्माण संस्थेची नोंदणी केली. मालेगाव रोडवर जागा घेऊन बंगले बांधले व मध्य भागातून कॉलनी रोड ठेवला. पूर्वी त्या परिसरात सगळीकडे शेती असल्यामुळे कॉलनी रोडच्या उत्तर बाजूस रस्त्यावर भिंत बांधून रोड बंद केला. मात्र, आता त्या परिसरात प्लॉट पडल्यामुळे कॉलनी रोड वापरण्याची गरज निर्माण झाली, तेव्हा संस्थेने कॉलनी रोड त्यांचा खासगी आहे. नगर परिषदेचा त्याच्याशी संबंध नाही, अशी भूमिका घेतली व रस्त्यावर बांधलेली भिंत काढून घेण्यास नकार दिला.
काही नागरिक शासनाकडे गेले, तेव्हा नगरविकास राज्यमंत्र्यांनीही सदरची भिंत पाडून एकाकी असा आदेश केला, तरीही संस्थेने भिंत काढली नाही. म्हणून नगर परिषदेने संस्थेला भिंत काढून घेण्याबाबत नोटीस दिली. तेव्हा संस्थेने नोटीस बेकायदेशीर आहे, असे सांगून न्यायालयात धाव घेतली व तात्पुरता मनाई हुकूम घेतला.
मात्र, आता चौकशीअंती कॉलनी रोड हा नगर परिषेदेचा आहे. त्यामुळे त्यावर बेकायदेशीररीत्या बांधलेली भिंत काढून टाकण्यास नगर परिषदेला अधिकार आहे. या निकालामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.