अखेर पिंपळगाव पोलीस ठाण्याची ट्रीगं ट्रीगं सुरू...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 03:28 PM2020-08-10T15:28:13+5:302020-08-10T15:28:57+5:30

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव पोलीस ठाण्याचा फोन गेल्या १५ ते २० दिवसांपासून बंद होता त्यामुळे तक्र ारदाराशिवाय पोलीस कर्मचारी देखील चांगलेच परेशान झाले होते. एखाद्या घटनेची तक्र ार कशी करायची, माहिती कशी घ्यायची असा प्रश्न उपस्थित झाला होता. पंधरा वीस दिवस होऊनही त्या दूरध्वनीची सेवा सुरू करून घेण्याची तसदी देखील घेतली नाही त्यामुळे लोकमतमध्ये याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्याचा दूरध्वनी बंद असल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्यावर लागलेच फोन दोनच दिवसात सुरू झाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांसह तक्र ारदारांनी समाधान व्यक्त करत लोकमतचे आभार मानले.

Finally, Pimpalgaon police station's trigger trigger started ... | अखेर पिंपळगाव पोलीस ठाण्याची ट्रीगं ट्रीगं सुरू...

अखेर पिंपळगाव पोलीस ठाण्याची ट्रीगं ट्रीगं सुरू...

Next
ठळक मुद्देपोलीस ठाण्याचा दूरध्वनी बंद असल्याने चांगलेच त्रास सहन करावे लागत होते.

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव पोलीस ठाण्याचा फोन गेल्या १५ ते २० दिवसांपासून बंद होता त्यामुळे तक्र ारदाराशिवाय पोलीस कर्मचारी देखील चांगलेच परेशान झाले होते. एखाद्या घटनेची तक्र ार कशी करायची, माहिती कशी घ्यायची असा प्रश्न उपस्थित झाला होता. पंधरा वीस दिवस होऊनही त्या दूरध्वनीची सेवा सुरू करून घेण्याची तसदी देखील घेतली नाही त्यामुळे लोकमतमध्ये याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्याचा दूरध्वनी बंद असल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्यावर लागलेच फोन दोनच दिवसात सुरू झाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांसह तक्र ारदारांनी समाधान व्यक्त करत लोकमतचे आभार मानले.
पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात १३००३३ हा बीएसएनएलचा दूरध्वनी आहेत. मात्र तो पंधरा ते वीस दिवसांपासून बंद अवस्थेत होता. त्यामुळे परिसरातील तक्र ारदारासह ठाणे अंमलदार देखील हैराण झाले होते. नागरिकांना एखादी तक्र ार करण्यासाठी किंवा माहिती देण्यासाठी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना देखील माहिती मागवायची असेल तर सगळ्यात उपयोगी पडणारा पोलीस ठाण्याचा दूरध्वनी बंद असल्याने चांगलेच त्रास सहन करावे लागत होते.
पिंपळगावसह परिसरातील गावे मिळून या पोलीस ठाण्याच्या परिसरात २४ गावांचा परिसर असून देखील पोलीस ठाण्याची इमर्जन्सी सेवा देणारा फोन १० ते १५ दिवसांपासून बंद असूनही तो सुरू करण्याबाबत कोणतीच तसदी घेतली नाही. परंतु ही बाब लोकमत मध्ये प्रसिध्द झाली, त्यामुळे ताबडतोब दोन दिवसात पिंपळगाव पोलीस ठाण्याचा इमर्जन्सी सेवा देणारा दूरध्वनी सुरू झाला.

Web Title: Finally, Pimpalgaon police station's trigger trigger started ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.