अखेर बरड्याच्या वाडीतील शाळा दुरुस्तीचे काम झाले सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 07:14 PM2019-12-24T19:14:47+5:302019-12-24T19:16:46+5:30
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील बरड्याच्या वाडीतील मोडकळीस आलेल्या शाळेच्या इमारत दुरुस्तीला अखेर शुभारंभ करण्यात आला.
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील बरड्याच्या वाडीतील मोडकळीस आलेल्या शाळेच्या इमारत दुरुस्तीला अखेर शुभारंभ करण्यात आला.
सदर इमारतीकडे प्रशासनाकडून दूर्लक्ष झाल्याने पावसाळ्यात शाळा इमारत ठिकठिकाणी गळत होती. बऱ्याच भिंती पडल्या होत्या. ही शाळा कधीही पडेल व विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता.
या मोडकळीस आलेल्या शाळा इमारतीची दुरु स्ती करावी यासाठी श्रमजीवी संघटनेने वारंवार पाठपुरावा केला आहे. मागील दोन महिन्यापुर्वी संघटनेने आंदोलन केले होते. त्यावेळी शिक्षण अधिकारी यांनी लेखी पत्र देवून दोन महिन्यात शाळेच्या इमारतीची दुरु स्ती केली जाईल असे आश्वासन गटशिक्षणाधिकारी राजेंद्र शिरसाट यांनी गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांच्या समोर दिले होते.
मात्र दिलेल्या मुदतीत काम केले नाही म्हणून शुक्रवारी (दि.५) बरड्याच्या वाडीची सर्व मुले शिक्षण घेण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात आली होती. तेथे शाळा देखिल भरविण्यात आली, आणि जो पर्यंत शाळेचे दुरु स्तीचे काम सुरु होत नाही तो पर्यंत गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर शाळा भरवली जाईल अशी भूमिका श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली. यावर गटशिक्षणाधिकारी यांनी गुरुवारी (दि.१२) काम सुरू करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले होते.
अखेर देवगाव ग्रामपंचायत कडून सदर शाळा इमारत दुरु स्तीच्या कामाला त्याच दिवशी गुरुवारी सुरु वात करण्यात आली आहे. या दुरु स्ती कामाला २ लाख ५५ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.