निसाकाच्या १५ संचालकांचे अखेर राजीनामे सादर

By admin | Published: August 14, 2014 11:16 PM2014-08-14T23:16:35+5:302014-08-15T00:28:55+5:30

निसाकाच्या १५ संचालकांचे अखेर राजीनामे सादर

Finally, resigns of 15 directors of Nissaka | निसाकाच्या १५ संचालकांचे अखेर राजीनामे सादर

निसाकाच्या १५ संचालकांचे अखेर राजीनामे सादर

Next

भाऊसाहेबनगर : निफाड सहकारी साखर कारखान्याच्या १५ संचालकांनी कारखाना सहकारी तत्त्वावर चालविणे अवघड असल्याचे सांगत आपल्या संचालकपदाचे राजीनामे कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक भागवत भंडारे यांच्याकडे सुपूर्द केले आहे.
कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संचालक डी. बी. मोगल म्हणाले की, कारखान्याची आर्थिक परिस्थिती, कर्जाचा वाढलेला डोंगर, संचित तोटा, उसाचा अनियमित पुरवठा यामुळे कारखाना सहकारी तत्त्वावर चालविणे अशक्यच असून, कारखाना सरकारी मदतीशिवाय चालविणे शक्य नसल्याचे सांगितले. सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी त्यांनाही निमंत्रण दिले होते. परंतु नारायण शिंदे हे सभासद वगळता एकही सभासद उपस्थित राहिला नसल्याने सभासद आमच्या राजीनाम्याच्या निर्णयाशी सहमत असल्याचे डी. बी. मोगल म्हणाले.
कारखाना चालू रहावा यासाठी सहभागी तत्त्वावर किंवा खासगी तत्त्वावर चालविण्यास द्यावा, यासाठी संचालकांनी भरपूर प्रयत्न केले. परंतु सहभागी किंवा खासगीत चालविण्यास दिल्यास तालुक्यातील राजकारण्यांना कारखान्याची सत्ता उपभोगता येणार नाही त्यामुळे केवळ राजकारणासाठी कारखान्यांची वाताहात पुढाऱ्यांनीच लावली असल्याचा आरोप मोगल यांनी केला. संचालक बाळासाहेब जाधव यांनी कारखान्याची संपूर्ण आर्थिक परिस्थिती विशद करून कारखाना सहभागी तत्त्वावर देण्यासंदर्भात २९ मे २०१२ चे सभेत कोअर कमिटीचे अहवालावर निर्णय घेण्याचे ठरले. कारखान्याचे संचालक मंडळ अस्तित्वात असताना कमिटी तयार करण्याचा निर्णय दुर्दैवी होता. कारखान्यांचा संचित तोटा १५० कोटी बँका, शासकीय व इतर देणी २६६ कोटी ३७ लाखांची असल्याने सहकारी तत्त्वाऐवजी शासकीय स्तरावरून कार्यवाही व्हावी यासाठी संचालकपदाचे राजीनामे देत असल्याचे संचालक मंडळाने स्पष्ट केले.
संचालक देवराम मोगल, बाळासाहेब जाधव, अ‍ॅड. शांताराम बनकर, हिरालाल सानप, दिलीपराव मोरे, अंबादास कापसे, उद्धव कुटे, बबनराव पानगव्हाणे, दिनकर मत्सागर, लक्ष्मणराव टर्ले, एकनाथ डुंबरे, बबनराव सानप, शहाजी डेर्ले, दौलतराव मुरकुटे, श्रीमती गंगूबाई कदम आदि १५ संचालकांनी संचालकपदाचे राजीनामे भंडारे यांच्याकडे दिले. सदर राजीनामे पुढील कार्यवाहीसाठी प्रादेशिक सहसंचालक अहमदनगर यांच्याकडे पाठविणार असल्याचे भंडारे यांनी स्पष्ट केले आहे.
दिलीपराव बनकर, राजेंद्र कटारनवरे, शिवाजी गडाख यांच्यासह सुभाष होळकर यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला. परंतु त्यांनी पुढे कोणत्याही कामकाजात सहभाग घेतला नाही. विद्यमान अध्यक्ष भागवत बोरस्ते, रावसाहेब रायते, कचरू राजोळे, सौ. सिंधुताई खरात, सौ. लीलावती तासकर हे यावेळी अनुउपस्थित होते. त्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिलेले नाहीत. (वार्ताहर)
वक्तृत्व स्पर्धेत
दिव्या साळुंके तृतीय
सिन्नर : येथील लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयाची
विद्यार्थिनी दिव्या संजय साळुंके
हिने मविप्रच्या जिल्हास्तरीय
वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला.

Web Title: Finally, resigns of 15 directors of Nissaka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.