...अखेर १९९ शेतकऱ्यांच्या पदरात पडले पावणे सात कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 05:13 PM2020-12-17T17:13:26+5:302020-12-17T17:16:41+5:30

नाशिक ग्रामिणमधील १८१ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर १८३ व्यापाऱ्यांकडून आपआपसांत तडजोड करत नाशिकच्या सुमारे १७७ शेतकऱ्यांना आतापर्यंत ५ कोटी ५५ लाख १८ हजार ५३९ रुपये प्रत्यक्षपणे मिळाले आहेत. 

... Finally, seven crores fell to the ranks of 199 farmers | ...अखेर १९९ शेतकऱ्यांच्या पदरात पडले पावणे सात कोटी

...अखेर १९९ शेतकऱ्यांच्या पदरात पडले पावणे सात कोटी

Next
ठळक मुद्दे१९१ व्यापाऱ्यांवर गुन्हे; सर्वाधिक १८१ गुन्हे नाशिकमध्ये नाशिक ग्रामीण पोलिसानी मिळवून दिली १७७ शेतकऱ्यांना रक्कम

नाशिक : परिक्षेत्रातील अहमदनगर, जळगाव, नाशिक ग्रामिण, धुळे, नंदुरबार या पाच जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध घेतला गेला. यामध्ये सर्वाधिक १८१ गुन्हे नाशिक ग्रामिणमध्ये दाखल झाले असून आतापर्यंत वरील जिल्ह्यांमधील एकुण १९९ शेतकऱ्यांच्या पदरात ६ कोटी ७५ लाख ८८ हजार रुपये इतकी रक्कम पडली आहे. उर्वरित ५ कोटी ८४ लाख ४५ हजार ६१० रुपयांची रक्कम देण्यास व्यापाऱ्यांनी तयारी दर्शविल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी दिली.

शेतकरी, सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांचा बंदोबस्त अन‌् गुटखा-मटका मुक्त उत्तर महराष्ट्र असे यापुढे नाशिक परिक्षेत्रातील पोलिसांचे मिशन असेल, अशी घोषणा दिघावकर यांनी विशेष पोलीस महानिरिक्षकपदाचा पदभार स्विकारताच केली होती. यानुसार त्यांनी पाचही जिल्ह्यांच्या पोलीस अधिक्षक व अपर पोलीस अधिक्षकांना शेतकरी फसवणुक, सुशिक्षित बेरोजगारांच्या फसवणुकीच्या तक्रारींचा निपटारा प्राधान्याने करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, तीन महिन्यांत नाशिक परिक्षेत्रात सुमारे १ हजार १९२ तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींचा पाठपुरावा करत १९१ व्यापाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आणि उर्वरित २०० व्यापाऱ्यांशी तडजोड करत पोलिसांनी १९९ व्यापाऱ्यांना सुमारे सहा कोटी ७५ लाख ८८ हजार १०० रुपयांची रक्कम परत करण्यास पोलिसांना यश आल्याचे दिघावकर म्हणाले.
अहमदनगरमध्ये ९, जळगाव, धुळ्यातून प्रत्येकी ४ तर नंदूरबारमधून १४ शेतकऱ्यांनी आपली फसवणूक झाल्याचे अर्ज पोलिसांकडे केले होते. यामध्ये सर्वाधिक नाशिक जिल्ह्यातून १ हजार १६१ अर्ज नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळाले होते. यामध्ये एकूण ४४ कोटी ५७ लाख ७४ हजार ३५४ रुपयांची मोठी फसवणुक झाल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी व्यापाऱ्यांचा राज्यात व राज्याबाहेर कसोशीने शोध सुरु केला.

नाशिकच्या १७७ शेतकऱ्यांना मिळाली रक्कम
नाशिक ग्रामिणमधील १८१ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर १८३ व्यापाऱ्यांकडून आपआपसांत तडजोड करत नाशिकच्या सुमारे १७७ शेतकऱ्यांना आतापर्यंत ५ कोटी ५५ लाख १८ हजार ५३९ रुपये प्रत्यक्षपणे मिळाले आहेत. 

Web Title: ... Finally, seven crores fell to the ranks of 199 farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.