...अखेर ‘ती’ चिमुकली पुन्हा आईच्या कुशीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:19 AM2021-02-17T04:19:54+5:302021-02-17T04:19:54+5:30

जिल्हा शासकीय रुग्णालयातून शनिवारी दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास ठाणे जिल्ह्यातील एका परप्रांतीय महिलेची एक वर्षाची चिमुकली येथील बाकावर झोपलेली ...

... finally ‘she’ smiled again in her mother’s arms | ...अखेर ‘ती’ चिमुकली पुन्हा आईच्या कुशीत

...अखेर ‘ती’ चिमुकली पुन्हा आईच्या कुशीत

Next

जिल्हा शासकीय रुग्णालयातून शनिवारी दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास ठाणे जिल्ह्यातील एका परप्रांतीय महिलेची एक वर्षाची चिमुकली येथील बाकावर झोपलेली होती. यावेळी संशयित माणिक सुरेश काळे (४८,रा.शनी मंदिराजवळ फुलेनगर, पंचवटी) याने आईची नजर चुकवून या चिमुकलीला उचलून पलायन केले होते. तीन दिवस काळे याने त्या चिमुकलीला आपल्या राहत्या घरात ठेवले होते. दरम्यान, चिमुकली गायब झाल्यापासून शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांचे गुन्हे शोध पथक चिमुकलीसह त्या अनोळखी अपहरण करणाऱ्या इसमाचा शोध घेत होते. शहरातील सर्वच परिसर आणि शक्यता असलेली विविध ठिकाणे पोलिसांनी पिंजून काढले होते. इतकेच नव्हे तर जिल्ह्याबाहेरसुध्दा तपासी पथके रवाना झाली होती; मात्र चिमुकलीला घेऊन पलायन करणाऱ्या इसमाचा कोठेही मागमूस लागत नव्हता. यामुळे मुलीची आई आणि नातेवाईकांचीही चिंता पराकोटीला पोहचली होती. आईने सलग तीन दिवस जिल्हा रुग्णालयातच तळ ठोकून मोबाईलद्वारे चिमुकलीचा फोटो ये-जा करणाऱ्या नागरिकांना दाखवत ‘माझ्या मुलीला कोणी बघितले का’ असे विचारत होती.

---इन्फो---

मुलगी दगावल्याने बालिकेचे केले अपहरण

पोलिसांनी संशयित काळे यास ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने दोन महिन्यांपूर्वी त्याची स्वत:ची मुलगी मृत्यूमुखी पडल्यामुळे या चिमुकलीचे अपहरण केल्याचे कारण प्रथमदर्शनी पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान, काळे याची सरकारवाडा पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याचा पूर्वइतिहास तपासून फुलेनगर भागातील नागरिकांकडूनही त्याच्या वर्तणुकीबद्दलची माहिती गोळा केली जात आहे.

---इन्फो--

आईच्या आनंदापुढे आकाश ठेंगणे

तीन दिवसांपासून आपल्या चिमुकलीच्या विरहात ढसाढसा अश्रू गाळणाऱ्या त्या मातेचे डोळेही कोरडे पडले होते. दूध पिणारे बाळ कोठे असेल? कोणी नेले? ती काय खात-पीत असेल? अशा विविध विवंचनेने त्या मातेचे मन सुन्न झाले होते. एकीकडे बहिणीच्या प्रसूतीची वेळ अन‌् दुसरीकडे आपली एकुलती एक मुलगी अचानकपणे रुग्णालयातून गायब होते या विचाराने ती पुरती खचली होती. दरम्यान, मंगळवारचा दिवस उजाडला अन‌् नियतीने पुन्हा तिचे हरविलेले बाळ मातेच्या झोळीत टाकले अन‌् आपल्या लहानग्या चिमुकलीचे लाड करताना तिच्या आनंदापुढे जणू आकाशही ठेंगणे झाले होते.

--

फोटो आर वर १६काळे नावाने. याच संशयिताने चिमुकलीला पळवून नेले होते.

===Photopath===

160221\16nsk_21_16022021_13.jpg

===Caption===

अपहरणकर्ता माणिक काळे

Web Title: ... finally ‘she’ smiled again in her mother’s arms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.