..अखेर सिंगल फेजचे रोहित्र दुरुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 11:38 PM2020-02-21T23:38:26+5:302020-02-22T01:20:40+5:30
सिंगल फेज योजनेच्या रोहित्र जळाल्याने कामकाज ठप्प असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये बुधवारी (दि.१९) प्रसिद्ध होताच महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाग आली आहे. या वृत्ताची दखल घेत मुखेड महावितरण कार्यालयाने दखल घेत गुरु वारी (दि.२०) सकाळी अभियंता अमोल राजोळे यांच्या मार्गदर्शनाखाली वायरमन दत्तात्रय जाधव व सहकाऱ्यांनी येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील सिंगल फेज योजनेचे रोहित्र चालू केले.
मानोरी : सिंगल फेज योजनेच्या रोहित्र जळाल्याने कामकाज ठप्प असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये बुधवारी (दि.१९) प्रसिद्ध होताच महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाग आली आहे. या वृत्ताची दखल घेत मुखेड महावितरण कार्यालयाने दखल घेत गुरु वारी (दि.२०) सकाळी अभियंता अमोल राजोळे यांच्या मार्गदर्शनाखाली वायरमन दत्तात्रय जाधव व सहकाऱ्यांनी येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील सिंगल फेज योजनेचे रोहित्र चालू केले.
मागील आठ ते दहा दिवसांपासून गावात दळणवळणाची मोठी समस्या निर्माण झाली होती. मुखेड, देशमाने, जळगाव नेऊर आदी ठिकाणी जाऊन ग्रामस्थांना दळण दळून आणण्याची वेळ आली होती. आता वीजपुरवठा सुरळीत चालू झाल्याने ग्रामस्थांची दळणवळणाची गैरसोय दूर झाल्याने ग्रामस्थांनी लोकमतचे आभार मानले आहे. दरम्यान, मागील तीन दिवसांपूर्वी याच रोहित्राचा दुसरा बॉक्सदेखील खराब झाला होता. सलग दोन बॉक्स खराब झाल्याने एकाच बॉक्सवर संपूर्ण गावातील विजेचा अतिरिक्त भार हा एकाच बॉक्सवर आला होता. याबाबतचे वृत्त प्रसारित केल्यानंतर तत्काळ सिंगल फेज योजनेचे तिन्ही बॉक्स उघडून ते पुन्हा सुरळीत चालू करून वीजपुरवठा सुरळीत झाला आहे.