अखेर रस्त्यांच्या कॉँक्रीटीकरणाला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 11:45 PM2020-08-28T23:45:06+5:302020-08-29T00:12:32+5:30
पावसाळ्याच्या तोंडावर वडाळागाव परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे कॉँक्रिटीकरण मनपा प्रशासनाकडून हाती घेण्यात आले. गटारी आणि जलवाहिन्यांच्या रेंगाळलेल्या कामामुळे काँक्रिटी-करणाचाही खोळंबा झाला. परिणामी पावसामुळे नागरिकांच्या दारात चिखलाचे साम्राज्य पसरले. नागरिकांमधून ढिसाळ नियोजनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असताना ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर मनपा प्रशासन खडबडून जागे झाले आणि गावातील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाला अखेर गती मिळाली.
नाशिक : पावसाळ्याच्या तोंडावर वडाळागाव परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे कॉँक्रिटीकरण मनपा प्रशासनाकडून हाती घेण्यात आले. गटारी आणि जलवाहिन्यांच्या रेंगाळलेल्या कामामुळे काँक्रिटी-करणाचाही खोळंबा झाला. परिणामी पावसामुळे नागरिकांच्या दारात चिखलाचे साम्राज्य पसरले. नागरिकांमधून ढिसाळ नियोजनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असताना ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर मनपा प्रशासन खडबडून जागे झाले आणि गावातील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाला अखेर गती मिळाली.
मूलभूत सोयीसुविधांचा नेहमीच बोजवारा ज्या भागात उडालेला दिसतो, त्या वडाळागावातील अंतर्गत रस्ते दुरुस्तीचे काम मनपाने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर चार महिन्यांपूर्वी हाती घेतले. रस्ते काँक्रीटीकरण करण्यासाठी सरसकट गल्ली-बोळासह अंतर्गत वापराचे रस्ते खोदण्यात आले. परिणामी सध्यस्थितीत गावात रस्ते केवळ नावाला उरले असून, सर्वत्र चिखलामुळे बजबजपुरी निर्माण झाली आहे. रस्ते विकासाच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत होता. वडाळा गावातील रस्त्यांची अवस्था मागील चार महिन्यांपासून कायम आहे .
वडाळ्यातील सर्वत अंतर्गत रस्त्यांचे कॉँक्रीटीकरणाचे काम महापालिकेने मंजूर केले हे काम सुरू होण्याअगोदर त्याचे नियोजन अत्यंत ढिसाळ पद्धतीने झाल्यामुळे वडाळा गावातील सर्वच रस्त्यांची दैनावस्था झाली आहे परिणामी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
गावातील मुख्य रस्ताही तातडीने दुरुस्त करण्याचे आश्वासन
याबाबत ‘लोकमत’ने नागरिकांच्या प्रतिक्रि या जाणून घेत विशेष वृत्त बुधवारी (दि.२६) प्रसिद्ध केले. या वृत्ताची दखल घेत मनपा अधिकाऱ्यांनी संबंधित कामाची पाहणी करत ठेकेदाराला काँक्र ीटीकरण वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. तसेच रेंगाळलेल्या भुयारी गटारीच्या जोडणीची कामे, जलवाहिन्याची दुरु स्ती आदींदेखील प्राधान्याने मार्गी लावण्यचे आदेश दिले गेले. यानंतर राजवाडा, गोपालवाडी, माळीगल्ली, खोडे गल्ली, मनपा शाळा परिसरात अंतर्गत रस्ते काँक्र ीटीकरणाला वेग आला. दोन महिन्यांपूर्वी या भागातील रस्ते खोदून ठेवण्यात आलेले होते. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. येत्या आठवड्यात गावातील अंतर्गत सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्णत्वास येणार असल्याचे मनपाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गावातील मुख्य रस्तादेखील तातडीने दुरु स्त केला जाणार आहे. मनपा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.