...अखेर गोदापात्रातील पाणवेली काढण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:15 AM2021-05-09T04:15:23+5:302021-05-09T04:15:23+5:30

सध्या कोरोनामुळे शासकीय निर्बंध लागू असून, नागरिक रस्त्यावर नाहीत, तसेच अनेक उद्योग, व्यवसाय बंद आहेत. अशावेळी गोदापात्र नितळ आणि ...

... finally start removing the watermelon from the Godapara | ...अखेर गोदापात्रातील पाणवेली काढण्यास प्रारंभ

...अखेर गोदापात्रातील पाणवेली काढण्यास प्रारंभ

Next

सध्या कोरोनामुळे शासकीय निर्बंध लागू असून, नागरिक रस्त्यावर नाहीत, तसेच अनेक उद्योग, व्यवसाय बंद आहेत. अशावेळी गोदापात्र नितळ आणि स्वच्छ दिसणे अपेक्षित असताना अनेक ठिकाणी गोदापात्र कोरडे ठाक, तर काही ठिकाणी पाणवेलींची हिरवळ दिसत आहे. त्यामुळे गोदाप्रेमींकडून टीकेचा भडीमार सुरू झाला होता. गोदावरी रक्षणाची जबाबदारी कोणाची इथपासून ते उच्चाधिकार समिती आणि राज्य शासनाकडेदेखील तक्रारी करण्याची तयारी सुरू होती. मात्र, महापालिकेचे पर्यावरण अधिकारी शिवकुमार वंजारी यांनी अखेरीस स्मार्ट सिटीशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावला आहे.

सध्या आसाराम बापू आश्रमाजवळील पुलाजवळ गोदावरी नदीवर आणखी एक पूल बांधण्याचे काम सुरू आहे, तर दुसरीकडे होळकर पुलाजवळ गाळ काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सध्या दोन ठिकाणी पाणी अडवून ठेवण्यात आल्याने नदीपात्रातील पाणी प्रवाही नाही. त्यामुळे नदीपात्रात ज्याठिकाणी पाणी साचले आहे तेथे अशाप्रकारच्या पाणवेली तयार होतात असे महापालिकेचे म्हणणे आहे. या आधी पाणवेली काढण्याचे काम दसक पंचक येथे सुरू होते. आता हे काम होळकर पुलाजवळ सुरू करण्यात आले असून, त्यामुळे बऱ्यापैकी पाणवेली काढण्यात आल्या आहेत.

इन्फो..

महापालिकेत समन्वय नाही..

महापालिकेत पर्यावरण विभाग नावालाच असून, या विभागाकडे स्टाफ नाही. त्यामुळे प्रदूषणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागापासून ते विभागीय अधिकाऱ्यांना विविध कामांच्या जबाबदारीचे वितरण आयुक्तांनी यापूर्वीच करून दिले आहे. मात्र, गोदावरी नदीकडे पाहण्यास अन्य विभागांना सवड नाही. त्यामुळे दिवसेंदिवस गोदावरी नदीची अवस्था बिकट होत आहे.

----------

छायाचित्र आर फोटोवर ०८ पाणवेली नावाने सेव्ह...

===Photopath===

080521\08nsk_43_08052021_13.jpg

===Caption===

नाशिक शहरातील हेाळकर पुलाजवळ पानवेली काढण्याचे काम सुरू आहे.

Web Title: ... finally start removing the watermelon from the Godapara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.