अखेर बारावा संशयित पोलिसांना शरण

By admin | Published: January 3, 2017 01:55 AM2017-01-03T01:55:10+5:302017-01-03T02:12:29+5:30

बनावट नोटा प्रकरण : आठ संशयितांची कारागृहात रवानगी; नागरेसह चौघांच्या कोठडीत वाढ

Finally, surrender to the 12th suspect policeman | अखेर बारावा संशयित पोलिसांना शरण

अखेर बारावा संशयित पोलिसांना शरण

Next

नाशिक : १ कोटी ३५ लाख रुपयांच्या बनावट नोटा छपाई प्रकरणातील फरार संशयित रविवारी (दि़ १) रात्री पोलिसांना शरण आल्याने या गुन्ह्यातील संशयितांची संख्या बारा झाली आहे़ यातील अकरा संशयितांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी (दि़ २) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी़व्ही़ देढिया यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले़ न्यायालयाने संशयित संदीप सस्ते, छबू नागरे, रामराव पाटील व कृष्णा रामस्वरूप अग्रवाल (३५, रा़ रुद्राक्ष सोसायटीच्या बाजूला, कामगारनगर, सातपूर) यांना एक दिवसांची पोलीस कोठडी, तर उर्वरित आठही संशयितांची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले़ पुणे आयकर विभागाच्या माहितीनुसार आडगाव पोलिसांनी सापळा रचून २२ डिसेंबरला मध्यरात्री मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल जत्रासमोर तीन आलिशान कार अडवून ११ संशयितांकडून १़५ कोटी रुपयांच्या पाचशे व एक हजार रुपयांच्या बनावट नोटा, तर १़८० लाख रुपयांची जुन्या चलनातील नोटा जप्त केल्या होत्या़ तपासात पोलिसांनी संशयित नागरे याच्या खुटवडनगरमधील आॅसम ब्यूटिपार्लरमधून बनावट नोटा (पान ७ वर) छापण्यासाठीचे प्रिंटर, स्कॅनर, कटर मशीन, शाई, कागद जप्त करण्यात आले तसेच बँकेतील सुमारे ५८ लाखांची रक्कमही शोधून काढली़ पोलिसांनी अटक केलेल्या अकरा संशयितांना न्यायालयाने बारा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़ त्यामध्ये नागरे व पाटील हे नोटा छपाईतील प्रमुख सूत्रधार असल्याचे समोर आले, तसेच आणखी ८० कोटी रुपयांच्या नोटा छापण्याच्या ते तयारीत होते़ या प्रकरणातील संशयित अग्रवाल हा फरार होता, मात्र तो पोलिसांना शरण आला़ त्याने आणखी एका संशयिताचे नाव सांगितले असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत़ (प्रतिनिधी)

बचाव पक्षाचा युक्तिवाद

अ‍ॅड़ राहुल कासलीवाल व अ‍ॅड़ एम़ वाय़ काळे यांनी न्यायालयात संशयितांतर्फे युक्तिवादात करताना सांगितले की, संशयितांना बारा दिवसांची पोलीस कोठडी देऊनही त्याचा तपास बाकी आहे़ पोलिसांचा तपास पूर्ण झाला आहे, तर संशयित पांगारकर हे केवळ प्रवासी म्हणून बसलेले होते़ अग्रवालकडे असलेला संगणकाचा सीपीयू व हार्ड डीस्कही पोलिसांकडे आणून देतो त्यामुळे न्यायालयीन कोठडीची मागणी केली़

  या संशयितांच्या कोठडीत वाढ

संदीप संपतराव सस्ते, छबू दगडू नागरे, रामराव तुकाराम पाटील-चौधरी , कृष्णा रामस्वरूप अग्रवाल

Web Title: Finally, surrender to the 12th suspect policeman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.