अखेर विद्यापीठाने कर्मचाऱ्यांना स्वीकारले कंत्राटी कर्मचारी उपोषण : कुलगुरूंकडून लेखी आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:55 AM2018-06-01T01:55:30+5:302018-06-01T01:55:30+5:30
नाशिक : कंत्राटी कर्मचाºयांना कामावर रुजू करून घेण्याबाबतचे लेखी आश्वासन कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दिल्यानंतर गेल्या महिनाभरापासून सुरू असलेले कंत्राटी कामगारांचे उपोषण अखेर मागे घेण्यात आले.
नाशिक : कंत्राटी कर्मचाºयांना कामावर रुजू करून घेण्याबाबतचे लेखी आश्वासन कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दिल्यानंतर गेल्या महिनाभरापासून सुरू असलेले कंत्राटी कामगारांचे उपोषण अखेर मागे घेण्यात आले. कुलगुरूंच्या दालनात झालेल्या बैठकीत आमदार बाळासाहेब सानप, सीटूचे नेते, कामगार संघटनेचे प्रतिनिधी पोलीस अधिकारी आणि कुलगुरू यांच्यात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर कामगारांनी एकच जल्लोष केला.
कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत कामबंद केलेल्या कर्मचाºयांपैकी १०० कर्मचाºयांना तत्काळ रुजू करून घेण्याबाबत उर्वरित कर्मचाºयांना लवकर कामावर घेण्याबाबतचे लेखी आश्वासन देण्यात आले. विशेष म्हणजे विद्यापीठाने सदर कर्मचारी हे आमचे असल्याचे मान्य केल्याने सकारात्मक चर्चेचे मार्ग खुले झाले असल्याचे कॉम्रेड श्रीधर देशपांडे यांनी यावेळी सांगितले.