फायनान्स कंपनीची ६२ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:47 AM2019-07-27T00:47:14+5:302019-07-27T00:47:51+5:30
व्यावसायिक अथवा खासगी वापराच्या वाहनखरेदीसाठी एका खासगी गुंतवणूक व अर्थसहाय्य करणाऱ्या कंपनीकडून वाहन कर्ज मिळवून त्याची परतफेड न करता वाहनांची परस्पर विल्हेवाट लावून कंपनीची तब्बल ६२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे.
नाशिक : व्यावसायिक अथवा खासगी वापराच्या वाहनखरेदीसाठी एका खासगी गुंतवणूक व अर्थसहाय्य करणाऱ्या कंपनीकडून वाहन कर्ज मिळवून त्याची परतफेड न करता वाहनांची परस्पर विल्हेवाट लावून कंपनीची तब्बल ६२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे.
मायको सर्कलजवळील चोलामंडलम इनव्हेटस्टमेंट अॅण्ड फायनान्स कंपनीचे वसुली अधिकारी प्रफुल्ल अरुण पाटील (३८) यांनी या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणांमधील कर्जदारांविरोधात गुन्हा दाखल तपास सुरू केला आहे.
चेहडी येथील शैला शिरोळे (४९) व भाविक शिरोळे (२७)यांनी कंपनीकडून वाहन खरेदीसाठी ८ लाख ९६ हजार रुपयांचे कर्ज घेऊन वाहनाची खरेदी केली. परंतु वाहनक र्जाची परफेड न करताच परस्पर संबंधित वाहनाची विल्हेवाट लावल्याचा आरोप कंपनीच्या वसुली अधिकाऱ्यांनी केला आहे.
तसेच घोटीतील अब्दुल रशीद शेख (४०) व अब्दुल हमीद शेख (३२) यांनी ४ लाख ३० हजार ९० रुपयांचे कर्ज घेऊन खरेदी केलेल्या वाहनाची कर्ज परतफेड न करता परस्पर विल्हेवाट लावली, त्याचप्रमाणे अंदरसूल येथील शिवाजी कहार (४६) व मंगल कहार यांनी यांनी वाहन खरेदीसाठी ८ लाख ३९ हजार ७३५ रुपये कर्ज घेऊन वाहन खेरदी केले होते. मात्र कर्जाची परतफेड न करता वाहनाची विल्हेवाट लावली. सायखेडा येथील अरुण सानप (५५) व परीक्षित सानप (२८) यांनी दोन लाख एक हजार २९० कर्ज घेऊन खरेदी केलेल्या वाहनाची कर्जफेड न करता परस्पर विल्हेवाट लावली. सातपूरच्या स्वारबाबानगर येथील विठ्ठल साळवे (४७) व नंदा साळवे (४६) यांच्याविरोधातही अशाचप्र्रकारे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांनी कंपनीकडून दोन लाख ७६ हजार ७५४ रुपयांचे कर्ज घेऊन वाहन खरेदी केले होते. मात्र कर्जाची परतफेड केली नसल्याचा आरोप वसुली अधिकाºयांनी केला आहे. सारसंगम सोसायटीतील प्रदीप ब्रह्मेचा (३३) व गुलाबचंद ब्रह्मेचा यांनी ४ लाख २१ हजार चारशे रुपयांचे कर्ज काढून वाहन खरेदी केले. परंतु कर्जाची परतफेड केली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.