टीव्हीसाठी कर्ज घेतल्याचे भासवून फायनान्स कपनीची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:11 AM2021-06-11T04:11:22+5:302021-06-11T04:11:22+5:30
नाशिक : टीव्ही खरेदीसाठी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज मंजूर करून घेत कंपनीला ग्राहकांनी टीव्ही खरेदी केल्याचे भासवून तब्बल ७ ...
नाशिक : टीव्ही खरेदीसाठी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज मंजूर करून घेत कंपनीला ग्राहकांनी टीव्ही खरेदी केल्याचे भासवून तब्बल ७ लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यातील काही रक्कम हप्त्यांच्या स्वरुपात आरोपींनी भरली असून उर्वरित २ लाख ५६ हजार ९४८ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार कंपनीकडून भद्राकाली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री साई इलेक्ट्रॉनिक्सचे मालक दीपाली गणेश झाल्टे व त्यांचे पती गणेश महेश झाल्टे यांनी होम क्रेडिट फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी हर्षल बाळासाहेब जाधव (३०) यांना आपण दुकानातून १३ ग्राहकांना कर्जावर टीव्ही देत असल्याचे भासवून कंपनीकडून ७ लाख ८१ हजार ४२० रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. हे कर्ज मंजूर झाल्यानंतर रोख स्वरुपात पंकज राऊत (२२, पंचवटी), सुप्रिया जोंधळे (४०, पंचवटी), सागर गवते (२७, सातपूर), वैभव शेजवळ (३०, उंबरखेड, ता. दिंडोरी), संदीप चंद्रमोरे (३०, सिद्धार्थनगर), शीतल देसले (२७, आनंदवल्ली) , गुणवंत वानखेडे (४०, अंबड), संतोष चव्हाण (४०, बीडी कामगार नगर), राघवयेंद्र ठाकूर (२२, सिडको), पुष्कर भंडारी(२७, पत्रकार कॉलनी) व राजेंद्र कुवर (२४, तोरणानगर, सिडको), मीनाक्षी बोंबले (२६, अमृतधाम), रंजना देसले (३४, कामठवाडे) दिले. या सर्वांनी तसेच फिर्यादी हर्षल जाधव यांनी त्यांच्या कंपनीमार्फत फाेनद्वारे विचारणा केली. त्यावेळी सर्वांनी टीव्ही घेतल्याचे खोटे सांगितले तसेच कंपनीकडून घेतलेल्या कर्जापोटी काही हप्त्यांची रक्कमही भरली असून उर्वरित २ लाख २६ हजार ९४८ रुपयांचा कंपनीस भरणा न करता या रकमेचा अपहार करत कंपनीची फसवणून केल्याची तक्रार हर्षल जाधव यांनी दिली आहे. त्यानुसार १३ ग्राहकांसह साई इलेक्ट्रॉनिक्सचे मालक झाल्टे दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आली आहे.