महावितरणची आर्थिक स्थिती सातत्याने बिकट : ढोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 01:19 AM2017-11-11T01:19:34+5:302017-11-11T01:21:33+5:30
महावितरणची आर्थिक स्थिती सातत्याने खालावत असल्याने अनावश्यक खर्चाला आळा घालून आवश्यक त्याच ठिकाणी खर्च करावा, तसेच व्यवस्थापनावरील वाढता खर्च नियंत्रणात ठेवून उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर करावा, असे प्रतिपादन महावितरणचे मानव संसाधन कार्यकारी संचालक सचिन ढोले यांनी केले.
नाशिकरोड : महावितरणची आर्थिक स्थिती सातत्याने खालावत असल्याने अनावश्यक खर्चाला आळा घालून आवश्यक त्याच ठिकाणी खर्च करावा, तसेच व्यवस्थापनावरील वाढता खर्च नियंत्रणात ठेवून उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर करावा, असे प्रतिपादन महावितरणचे मानव संसाधन कार्यकारी संचालक सचिन ढोले यांनी केले.
नाशिकरोड विद्युत भवन येथे गुरुवारी आयोजित आढावा बैठकीत नाशिक परिमंडलांतर्गत बाह्यस्त्रोत कर्मचाºयांची आवश्यकता, सद्यस्थिती, त्यांचे वेतन व इतर प्रश्न, बाह्यस्त्रोत कर्मचारी धोरणाची अंमलबजावणी, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रलंबित चौकशी प्रकरणे, पदोन्नती धोरण व नियोजन, प्रलंबित गोपनीय अहवाल निपटारा आदी विषयांबाबत ढोले यांनी विभागनिहाय आढावा घेतला.
मनुष्यबळ ही व्यवस्थापनाची संपत्ती असून, व्यवस्थापनाच्या हितासाठी मानव संसाधन विभागाने कर्मचाºयांचे सर्व प्रकारचे प्रलंबित प्रश्न तत्काळ निकाली काढण्यावर भर द्यावा. जेणेकरून कर्मचारी आपल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करेल. महावितरणच्या सर्व अधिकारी व कर्मचाºयांसाठी आस्थापनाविषयक बाबी व इतर अशा ६२ प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देणारे कर्मचारी पोर्टल लवकरच सुरू करण्यात येत असल्याचे ढोले यांनी सांगितले. उपविभागनिहाय बाह्यस्त्रोत कर्मचाºयांचा सेतू तयार करून आवश्यक त्या ठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. ज्यातून नियमित कर्मचाºयांना जादा वेळ काम केल्याबद्दल द्याव्या लागणाºया अधिकच्या पैशांची बचत होऊ शकेल अशी सूचना ढोले यांनी केली. यावेळी ढोले यांच्या हस्ते कर्मचाºयांना सुरक्षा गॉगल आणि प्रधानमंत्री विमा योजनेत सहभागी होण्यासाठी पोस्टाचे अर्ज देण्यात आले. बैठकीला नाशिक शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता सुनील पावडे, मालेगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता शैलेश राठोर, अहमदनगर मंडलाचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे, कल्याण प्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी महाव्यवस्थापक सुनील पाठक, सहायक महाव्यवस्थापक प्रवीण बागुल, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड, विश्वास पाटील, महाव्यवस्थापक अनिल बराटे, प्रभारी सहायक महाव्यवस्थापक राकेश बाविस्कर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.