संगणक क्लासचालकांचे आर्थिक गणित कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:14 AM2021-05-22T04:14:37+5:302021-05-22T04:14:37+5:30
सरकारी कार्यालये, खासगी क्षेत्र आणि बऱ्याच ठिकाणी संगणकाचा वापर हा मोठ्याप्रमाणात होत असतो. यासाठी दहावी आणि बारावीनंतर केंद्र शासनाचा ...
सरकारी कार्यालये, खासगी क्षेत्र आणि बऱ्याच ठिकाणी संगणकाचा वापर हा मोठ्याप्रमाणात होत असतो. यासाठी दहावी आणि बारावीनंतर केंद्र शासनाचा सीसीसी ( कोर्स आँन काॅम्प्युटर कन्सेप्ट) किंवा राज्य शासनाचा एमएस.सीआयटी या कोर्ससच्या परीक्षा पास होणे हे बंधनकारक असते. त्यामुळे दहावीची परीक्षा संपताच पालक मुलांना सीसीसी किंवा एमएस-सीआयटी या कोर्ससेला प्रवेश घेत असतात. मात्र मागील वर्षी २२मार्चपासून क्लासेसवर शासनाने बंधने घातली. त्यामुळे विद्यार्थ्यांना या परीक्षा देता येत नाहीत. जवळपास राज्य भरांमध्ये पाच हजारांपेक्षा जास्त क्लासेस आहेत. या क्लासेसमध्ये साधारणत: दरवर्षी लाखापेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेश घेत असतात. त्यातल्या त्यात मार्च, एप्रिल आणि मे या कालावधीत जास्त प्रवेश होत असतो. मार्च, एप्रिल आणि मे या कालावधीत होणाऱ्या प्रवेशातून वर्षभरातील एकूण उत्पन्नाच्या ७० ते ८० टक्के उत्पन्न या काळात क्लासचालकांना होत असते. त्याच्या जोरावरच वर्षभर हे क्लासेस सुरू असतात. मात्र मागील वर्षी आणि यावर्षी असं सलग दोन वर्ष मेगा बॅच न मिळाल्याने संगणक क्लासचालक हवालदिल झाले आहेत. सुशिक्षित आणि संगणकात प्रवीण असणाऱ्या तरुणांनी राज्यभर हे क्लासेस सुरू केले आहेत. शासनाने क्लासेस सुरू करण्याची परवानगी देऊन उपासमार थांबवावी, अशी मागणी होत आहे.
कोट.....
सध्या जागेचे भाडे, प्रशिक्षकांचे वेतन, दुरुस्ती देखभाल यांचा खर्च, लाइट बिल आणि, कर्जाचे हप्ते असे एक ना अनेक खर्च चालूच आहेत. हे काही चुकले नाही. हे खर्चचालकांना आता परवडेनासे झाले आहेत. यापुढेही क्लास सुरू होण्याची शाश्वती नसल्याने बँकांचे हप्ते भरायचे कसे, कुटुंब निर्वाह कसा करायचा? हा प्रश्न निर्माण झाला आहे. क्लास बंद पडल्यास या सर्व तरुण शिक्षकांचा प्रवास बेरोजगारीच्या दिशेने होण्याची शक्यता आहे.
- तुषार मंडलिक, संचालक, जिजाऊ कॉम्प्युटर्स, ओझर
फोटो- २१ कॉम्प्युटर
===Photopath===
210521\21nsk_12_21052021_13.jpg
===Caption===
फोटो- २१ काम्प्युटर क्लास