जिल्'ाला हवेत १९० कोटी रुपये वित्त नियोजन बैठक : नव्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली मागणी
By admin | Published: February 10, 2015 01:46 AM2015-02-10T01:46:59+5:302015-02-10T01:48:07+5:30
जिल्'ाला हवेत १९० कोटी रुपये वित्त नियोजन बैठक : नव्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली मागणी
नाशिक : आगामी कुंभमेळा आणि जिल्'ातील अन्य विविध विकासकामांसाठी १९० कोटी रुपयांची मागणी सोमवारी मुंबईत वित्त नियोजनाच्या बैठकीत करण्यात आली आहे. त्यातील १०० कोटी रुपयांची कुंभमेळा कामांसाठी गरज असून, त्यासाठी ही मागणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. वित्त नियोजनासाठी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांनी मुंबईत बैठक घेतली. यावेळी नवीन जिल्हाधिकाऱ्यांनी ही मागणी केली. नाशिक जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या महिन्यात पार पडली. त्यावेळी या बैठकीत जिल्हा नियोजनासाठी ८२० कोटी ४८ लाख रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आल होता. त्यात आता नव्याने वाढ करण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानुसार आणखी ९० कोटी रुपये विविध कामांसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नाशिकचे नूतन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी केली आहे. त्याचप्रमाणे कुंभमेळ्यासाठी मंजूर आराखड्यातील विविध कामे करण्यासाठी आणखी सुमारे १०० कोटी रुपयांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. कुंभमेळ्यासाठी दोन हजार ३७८ कोटी रुपयांचा आराखडा शासनाने यापूर्वीच मंजूर केला आहे. त्यानुसार निधीहीदेखील उपलब्ध होत आहे. तथापि, आता कुंभमेळा जवळ आल्याने विविध कामांसाठी निधीची गरज भासत असल्याने शंभर कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी कुशवाह यांनी केली.