हाजी अली माहीम ट्रस्टच्या माध्यमातून आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 05:44 PM2018-10-31T17:44:33+5:302018-10-31T17:44:46+5:30
मालेगाव : शहरातील नागछाप झोपडपट्टीच्या आगीत दुर्घटनाग्रस्त झालेल्यांना हाजी अली माहीम ट्रस्टच्या वतीने आर्थिक मदत केली जाईल. खऱ्या लाभार्थ्यांना मदतीचा लाभ दिला जाईल. याप्रश्नी राजकारण करू नये, असे आवाहन अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी केले आहे.
मालेगाव : शहरातील नागछाप झोपडपट्टीच्या आगीत दुर्घटनाग्रस्त झालेल्यांना हाजी अली माहीम ट्रस्टच्या वतीने आर्थिक मदत केली जाईल. खऱ्या लाभार्थ्यांना मदतीचा लाभ दिला जाईल. याप्रश्नी राजकारण करू नये, असे आवाहन अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी केले आहे.
गेल्या शनिवारी येथील नागछाप झोपडपट्टीला अचानक आग लागून सुमारे १६० झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष शेख यांनी जळीत झोपडपट्टीची पाहणी करुन दुर्घटनाग्रस्तांशी संवाद साधला. त्यानंतर येथील शासकीय विश्रामगृहात वरिष्ठ अधिकाºयांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शेख म्हणाले की, येथील पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांचे घटनेबाबत फोन आले होते. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन दुर्घटनाग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देवू. अत्यावश्यक साहित्य तातडीने पुरविण्यात येईल. आगीची चौकशी सुरू आहे. आगीची दुर्घटना कशी घडली याची चौकशी सुरू आहे. शहरवासियांनी प्रशासनाला सहकार्य करावे. दुर्घटनाग्रस्तांना मदत, पुनर्वसन व इतर मदतीबाबत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून चर्चा केली आहे. हाजी माहीम ट्रस्टच्या माध्यमातून मदत केली जाईल. येत्या १३ नोव्हेंबरपासून राज्यातील ३६ जिल्ह्यांचा दौरा करुन सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेणार आहोत. येथील यंत्रमाग व्यवसाय अडचणीत सापडला आहे. या अडचणींबाबत यंत्रमागधारकांनी निवेदन सादर करावे. संबंधित मंत्र्यांना याबाबत कळविण्यात येईल. येथील शिक्षणाचा दर्जा खालावलेला आहे. इंटरनॅशनल लेव्हलच्या शाळांची गरज आहे. व्यक्तीमत्व विकास शिबिरे घेणे गरजेचे आहे. उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय शिकविण्यासाठी मराठी शिक्षक नेमणे गरजेचे आहे. शहराचा विकास झाला पाहिजे. विकास कामांचा प्रस्ताव अल्पसंख्यांक आयोग व राज्य शासनाकडे सादर केला तर शासन याबाबत अनुकुल असल्याचे शेख यांनी पत्रकार परिषदेत शेवटी सांगितले.