लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 06:44 PM2018-11-10T18:44:05+5:302018-11-10T18:44:57+5:30
दिवाळी, भाऊबिजेसाठी आलेल्या माहेरवासिनी परतू लागल्याने त्यांच्या वर्दळीने बाजारपेठेतील रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत. दिवाळी व भाऊबीज सणासाठी झालेल्या खरेदीतून लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. सोेने व कापड या दुकानांमध्ये अधिक गर्दी दिसून आली आहे.
सिन्नर : दिवाळी, भाऊबिजेसाठी आलेल्या माहेरवासिनी परतू लागल्याने त्यांच्या वर्दळीने बाजारपेठेतील रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत. दिवाळी व भाऊबीज सणासाठी झालेल्या खरेदीतून लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. सोेने व कापड या दुकानांमध्ये अधिक गर्दी दिसून आली आहे.
दिवाळ सणात महिलावर्गाच्या दृष्टीने भाऊबीजेला महत्व आहे. लक्षीपूजनानंतर सासुरवाशिनींना माहेरी जाता येते. आता हे दोन्ही महत्वाचे सण आटोपल्याने घराकडून नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी परतणारे चाकरमानी तसेच सासरी परतणाऱ्या माहेरवासिनींमुळे प्रवासी वाहनांचीही चांगलीच चलती झाली. बाजारपेठ, बसस्थानकावर व खासगी वाहतुक करणाºया वाहनतळांवर प्रवाशांची तुडूंब गर्दी दिसून येत आहे. यंदा दिवाळीत सरकारी कर्मचाºयांना अनेक जोडून सुट्या आल्याने नोकरदारवर्ग पर्यटन व देवदर्शनासाठी बाहेर पडला होता. त्यांचाही परतीचा प्रवास सुरु झाल्याने नाशिक -पुणे महामार्गावर शनिवार दिवसभर गर्दी होती. अनेकदा वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागला होता.
दिवाळीच्या परतीच्यावेळी नेहेमीच अशी गर्दी दिसून येते. यंदाच्या दिवाळीवर दुष्काळाचे काहीसे सावट दिसून आले मात्र भाऊबीजेसाठी ये-जा करणाºया माहेरवासिनींमुळे गर्दी दिसून येत आहे. मुंबई - गुजरात मधील मंडळी याच सुटीच्या काळात पर्यटनासाठी बाहेर पडत असल्याने शिर्डी व पुणे रस्त्यावरील वाहतुक मोठ्या प्रमाणात वाढली असून वाहनांच्या तुंबळ गर्दीमुळे वाहनांची मोठी कोंडी होत आहे.
मुंबई - गुजरातेतील शिर्डीकडे येणाºया प्रवाशांच्या गर्दीमुळे रस्त्यांवरील अनेक हॉटेलही ग्राहकांनी फुलून गेल्याचे दिसून येत आहे. घरी आलेल्या माहेरवासीनींना व बालगोपाळांसाठी दिवाळीत खरेदी करणे हा परंपरेचा व आनंदाचा भाग असल्याने त्यांच्यासह सर्वजण बाजारपेठेत येत आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून बाजारपेठ ग्राहकांनी ओसंडून वाहात आहे.
फटाक्यांचे दर यंदा काहीसे वाढलेले असूनही या क्षेत्रात मोठी उलाढाल झाली. असे असले तरी लक्ष्मीपूजनाच्या सायंकाळी दाहीदिशांनी झालेली फटाक्यांची आतषबाजी आदल्या किंंवा दुसºया दिवशी मात्र तेवढ्या प्रमाणात दिसून आली नाही. चाकरमानी किंवा व्यावसायिक आपल्या कामाच्या गावी राहत्या घरी लक्ष्मीपूजन करतात. यानंतर पाडव्यासाठी ते आपल्या मूळ गावच्या घरी येतात. पतीचे औक्षण करुन गृहीणी चिल्यापिल्यांसह भावाला ओवाळण्यासाठी माहेरी जाण्यास निघते. लक्ष्मीपूजन, पाडवा व भाऊबीज हे सण तीन वेगवेगळ्या दिवशी येत असल्याने ते साजरे करण्याचे नियोजन करता येते. घरी पाडवा आटोपल्यानंतर दुपारनंतर व दुसºया दिवाशी भावाकडे जाणाºया माहेरवासीनींनींमुळे रस्त्यावर गर्दी झाली. बसस्थानका बरोबरच खासगी प्रवासी वाहतुकीच्या थांब्यांवर मोठी गर्दी उसळली. आता माहेरुन परतणाºयांच्या गर्दीने बाजारपेठ तसेच वाहतुक थांब्यांवर मोठी गर्दी दिसून येत आहे. अजून सुमारे दोन दिवस ही गर्दी दिसून येईल असा अंदाज आहे.