फायनान्सची लाखोंची फसवणूक
By Admin | Published: April 8, 2017 12:49 AM2017-04-08T00:49:33+5:302017-04-08T00:49:47+5:30
नाशिक : फायनान्स कंपनीला तारण देत पुन्हा अधिक कर्ज घेऊन ते न फेडता ९० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार गोविंदनगरमध्ये घडला आहे़
नाशिक : फायनान्सकडून फ्लॅटवर घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता त्याच फ्लॅटचा खोटा विक्री व्यवहार केल्याचे दाखवून पुन्हा तो फ्लॅट त्याच फायनान्स कंपनीला तारण देत पुन्हा अधिक कर्ज घेऊन ते न फेडता ९० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पाथर्डी फाटा परिसरातील गोविंदनगरमध्ये घडला आहे़
मुंबई नाका पोलीस ठाण्यात श्रीराम फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक संदीप भास्कर घुगे (३२, गोविंदपार्क अपार्टमेंट, वासननगर, पाथर्डी फाटा ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित निरंजन शिवाजी ठाकरे, शोभा ठाकरे, बालाजी व्यंकटरणम अय्यर व ज्ञानेश अवचट (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांनी आॅक्टोबर २०१५ मध्ये श्रीराम फायनान्स कंपनीकडून फ्लॅटसाठी कर्ज घेतले़
या कर्जाची परतफेड न करता संशयितांनी आपसात संगनमत करून फ्लॅटच्या खोटा विक्रीचा व्यवहार केला व पुन्हा हा विक्री केलेला फ्लॅट श्रीराम फायनान्स कंपनीलाच तारण देत पुन्हा ९० लाख रुपयांचे कर्ज घेतले़ यानंतर कर्जाची परतफेड न करता कंपनीचा विश्वासघात केला़
या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चौघा संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)