पार्किंग व्यवस्थेसाठी मिळेना कंत्राटदार

By admin | Published: May 21, 2017 01:38 AM2017-05-21T01:38:27+5:302017-05-21T01:38:42+5:30

नाशिक : शहरातील वाहतुकीच्या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने शहरात १२ ठिकाणी यांत्रिक पद्धतीची रोटरी पार्किंग व्यवस्था उभारण्याचा निर्णय घेतला आहे

Finding Contractors for Parking | पार्किंग व्यवस्थेसाठी मिळेना कंत्राटदार

पार्किंग व्यवस्थेसाठी मिळेना कंत्राटदार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरातील वाहतुकीच्या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने शहरात १२ ठिकाणी यांत्रिक पद्धतीची रोटरी पार्किंग व्यवस्था उभारण्याचा निर्णय घेतला परंतु, तीनवेळा निविदा काढूनही सदर व्यवस्थेसाठी कंत्राटदार पुढे येत नसल्याने महापालिकेने याप्रकरणी फेरविचार सुरू केला आहे. चौथ्यांदा निविदाप्रक्रिया राबवताना नेमक्या अडचणी लक्षात घेऊन त्यात गरजेनुसार सुधारणा करण्याची तयारी महापालिकेने चालविली आहे.
महापालिकेने शहरातील वाहनतळांचा गंभीर प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपाययोजना आखल्या आहेत. त्यात १२ ठिकाणी १४ रोटरी पार्किंग व्यवस्था उभारण्याचा प्रस्ताव तयार केला होता. सदर रोटरी पार्किंग व्यवस्थेसाठी महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय आवार, पंडित कॉलनीत लायन्स क्लबजवळील जागा, अशोकस्तंभ गुरांच्या दवाखान्याजवळ, शालिमार व सराफ बाजार ही ठिकाणे निश्चित केली आहेत.
तर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत राजीव गांधी भवन, इंद्रकुंड, निमाणी चौक, मालेगाव स्टॅण्ड, सोमाणी उद्यान नाशिकरोड याठिकाणी रोटरी पार्किंग व्यवस्था साकारली जाणार आहे. त्यात यांत्रिक पद्धतीने एकावर एक अशी वाहने उभी करण्याची व्यवस्था असणार आहे.
महापालिकेने शहरात रोटरी पार्किंग व्यवस्था उभारण्यासाठी तीनवेळा निविदाप्रक्रिया राबविली परंतु, निविदा भरण्यासाठी एकही कंत्राटदार अथवा संस्थेने त्यास प्रतिसाद दिलेला नाही.

Web Title: Finding Contractors for Parking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.