यात्रोत्सवानिमित्त गडावर चोख आरोग्य व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 07:45 PM2019-09-27T19:45:56+5:302019-09-27T19:47:48+5:30
नवरात्रोत्सवात दहा दिवस सप्तशृंगगडावर यात्रा भरते. देशाच्या विविध भागांतून भाविक दर्शनासाठी येत असल्याने लाखोंची गर्दी होत असते. दोन दिवसांपूर्वीच गडावर तुफान पर्जन्यवृष्टी झाली असून, त्यामुळे रोगराई व पाणी दूषित होण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचा विचार करता गडावर रोगराई टाळण्यासाठी
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : नवरात्रनिमित्त अर्धशक्तीपीठ असलेल्या सप्तशृंग गडावर भरणाऱ्या यात्रेसाठी येणाºया लाखो भाविकांच्या आरोग्य व्यवस्थेसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सर्वतोपरी काळजी घेतली असून, नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सुमारे शंभराहून अधिक कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी जागोजागी रुग्णवाहिका व वैद्यकीय पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.
नवरात्रोत्सवात दहा दिवस सप्तशृंगगडावर यात्रा भरते. देशाच्या विविध भागांतून भाविक दर्शनासाठी येत असल्याने लाखोंची गर्दी होत असते. दोन दिवसांपूर्वीच गडावर तुफान पर्जन्यवृष्टी झाली असून, त्यामुळे रोगराई व पाणी दूषित होण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचा विचार करता गडावर रोगराई टाळण्यासाठी आरोग्य विभागाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी सूचना केल्या आहेत. सप्तशृंग गडाच्या पायथ्यापासून ते पायी रस्ता व गडावर ठिकठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नांदुरी गावात जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र असून, याठिकाणी वैद्यकीय पथक असेल शिवाय १०८ रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आली आहे. पायी जाणा-या मार्गावर छत्री पॉइंटवर एक रुग्णवाहिका व वैद्यकीय पथक ठेवण्यात आले आहे. गडावरील रोप-वेच्या ठिकाणी डे केअर सेंटर, सप्तशृंग ट्रस्टच्या इमारतीत चोवीस तास आरोग्य सेवा देण्यासाठी वैद्यकीय पथक आहे. गडाच्या पायºयांजवळील राममंदिराजवळही डे केअर सेंटर तसेच शिवालयाजवळ रुग्णवाहिका ठेवण्यात आली आहे. ट्रस्टच्या जागेवर तीन कार्डियाक रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आले आहेत.
यात्रेपूर्वीच आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेण्यात आली असून, गावातील पाणी नमुने घेऊन ते तपासण्यासाठी पाठविण्यात आले आहेत तसेच पिण्याच्या पाण्याचे स्रोत असलेल्या ठिकाणी टीसीएल पावडर टाकण्यात आली असून, आरोग्य कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकाºयांकडे औषधाचा पुरेसा साठा ठेवण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली.