दोन दिवसांत अडीच लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 12:37 AM2020-07-03T00:37:40+5:302020-07-03T00:38:47+5:30

शहर व परिसरात जमावबंदी, संचारबंदी कायद्याचे उल्लंघन व मास्क वापरण्याच्या आदेशाचे उल्लंघन करणाºया बेजबाबदार नागरिकांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गुरुवारी (दि.२) दिवसभरात एकूण १ हजार २८३ लोकांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच मागील दोन दिवसांत शहरात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविणाºया बेशिस्त वाहनचालकांना २ लाख ५६ हजार १०० रुपयांचा दंड ठोठावला गेला आहे.

A fine of Rs 2.5 lakh in two days | दोन दिवसांत अडीच लाखांचा दंड

दुचाकीवर डबलसीट जाणाºया वाहनचालकांना अडवून दंडात्मक कारवाई करताना पोलीस.

Next
ठळक मुद्देएक हजार नागरिकांना दंड : मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई सुरूच

नाशिक : शहर व परिसरात जमावबंदी, संचारबंदी कायद्याचे उल्लंघन व मास्क वापरण्याच्या आदेशाचे उल्लंघन करणाºया बेजबाबदार नागरिकांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गुरुवारी (दि.२) दिवसभरात एकूण १ हजार २८३ लोकांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच मागील दोन दिवसांत शहरात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविणाºया बेशिस्त वाहनचालकांना २ लाख ५६ हजार १०० रुपयांचा दंड ठोठावला गेला आहे.
संध्याकाळ होताच विनाकारण कोणीही घराबाहेर पडणार नाही, ‘नाइट कर्फ्यू’ सक्तीने लागू केला आहे. तरीदेखील काही नागरिकांकडून उल्लंघन केले जात आहे. गुरुवारी दिवसभरात संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाºया २३ इसमांवर अदलखापात्र गुन्हे नोंदविले गेले तसेच दि. २२ मार्च ते दि.२ जुलै या कालावधीत संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकूण दहा हजार २८१ लोकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
४०० बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई
नाशिक शहरात दुचाकीवरून केवळ एका व्यक्तीला प्रवास करण्याची मुभा दिली आहे. तरीदेखील दोन व तीन व्यक्ती दुचाकीवरून प्रवास करताना आढळून आलेल्या ३९५ बेशिस्त चालकांवर तसेच पाच चारचाकी वाहनचालक अशा ४०० वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

दोन दिवसांत अडीच लाखांचा दंड
एक हजार नागरिकांना दंड : मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई सुरूच

Web Title: A fine of Rs 2.5 lakh in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.