दिंडोरीत मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून २९,६५० रुपये दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 07:45 PM2020-09-25T19:45:16+5:302020-09-25T19:46:43+5:30
दिंडोरी : शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने नियमांची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी कठोर भूमिका घेत मास्क न वापरणे सोसियल डिस्टन्स न पाळणे आदी नियम न पाळणार्या नागरिक व व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करत सलग दुसºया दिवशी २९,६५० रु पये दंड वसूल केला आहे.

दिंडोरी नगरपंचायचे मुख्याधिकारी नागेश येवले यांनी शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व खातेप्रमुख अधिकारी कर्मचारी यांची बैठक घेत जबाबदाºया वाटून दिल्या आहे. दोन दिवस स्वत: पूर्ण बाजारपेठेत फिरत व्यावसायिक व नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन केले .त्यानंतर भरारी पथकांची स्थापना करता मास्क न वापरणाºया नागरिकांवर तसेच दुकानांपुढे सोशयल डिस्टन्स न पाळणारे, वेळेनंतर व्यवसाय सुरू ठेवणाºया व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. गुरु वारी (दि.२४) ४१०० तर शुक्र वारी (दि.२५) २९,६५० दंड वसुली केली आहे. नागरिकांनी शासनाने केलेल्या सूचना नियमांची अंमलबजावणी करावी असे आवाहन नगराध्यक्ष रचना जाधव, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, मुख्याधिकारी नागेश येवले तसेच नगरसेवकांनी केले आहे.