दरेगावी मुक्काम ठोकणाऱ्यास पाच हजाराचा दंड ठोठावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 05:57 PM2020-06-23T17:57:51+5:302020-06-23T17:58:01+5:30
ग्रामपालिकेचा निर्णय : कोरोना प्रतिबंधीत उपाययोजना
सटाणा : नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाल्याने अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने लॉकडाऊन जाहीर झालेला असतानाच बागलाण तालुक्यातील दरेगाव ग्रामपंचायत व तंटामुक्ती समिती यांनी गाव पातळीवर निर्णय घेत गावातील कुणालाही कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गावास मुक्कामी येण्यास अथवा बाहेरगावी जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
दरेगाव ग्रामपंचायत हद्दीत बाहेरगावच्या व्यक्तीला किंवा नातेवाईकाला मुक्कामी येण्यास व दरेगाव मधील कोणत्याही व्यक्तीस बाहेरगावी मुक्कामी जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला असून असे आढळून आल्यास संबंधित व्यक्तीकडून किंवा संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांकडून पाच हजार शंभर रु पयांचा दंड वसूल करण्याचा निर्णय स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे.तसेच मास्क न लावता गावात फिरणाºया व्यक्तींविरोधात देखील ग्रामपंचायत प्रशासनाने कडक पावले उचलत अशा व्यक्तींकडून १५१ रु पये दंड वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे.
गत दोन दिवसांपासून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे दरेगाव गावात बाहेरगावातील कोणतीही व्यक्ती मुक्कामाला आल्याचे आढळून आलेले नसून ग्रामपंचायत प्रशासन व तंटामुक्ती समितीच्या सदस्यांचे गावातील प्रत्येक कुटुंबावर बारीक लक्ष असल्याने दरेगावातील कोणतीही व्यक्ती दुसºया गावात मुक्कामाला गेल्याचे आढळून आलेली नाही. या निर्णयाचे दरेगाव ग्रामस्थांसह आजूबाजूच्या ग्रामपंचायतींनी स्वागत केले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे दरेगाव ग्रामपंचायत हद्दीत दारूबंदी असून दारू विकण्यास व पिण्यास मनाई आहे. मागील आठवड्यात दरेगाव ग्रामपंचायत प्रशासन व तंटामुक्ती समिती यांनी दारू विक्र ी करणाऱ्यांवर व दारू पिणाºयांवर धडक कारवाई करत एकाच दिवसात तब्बल ४३ हजार रु पयांचा दंड वसूल केला आहे.