एकाच दिवसात ५० हजारांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:22 AM2021-02-23T04:22:57+5:302021-02-23T04:22:57+5:30
शहारात कोराेनाचे दुसरे संकट घोंघावू लागताच महापालिकेने आता मास्क आणि सुरक्षित अंतरासारख्या बाबतीत थेट कारवाईचा धडाका सुरू केला आहे. ...
शहारात कोराेनाचे दुसरे संकट घोंघावू लागताच महापालिकेने आता मास्क आणि सुरक्षित अंतरासारख्या बाबतीत थेट कारवाईचा धडाका सुरू केला आहे. त्यामुळे बााजारपेठा, बसस्थानक आणि भाजी बाजारासाख्या ठिकाणी आरोग्य विभागाकडून कारवाई सुरू होताच पळापळ सुरू होत असल्याचे दिसत आहे. नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. पुन्हा मोठे संकट येण्याची चिन्हे दिसताच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी (दि.२१) आरोग्य नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेचे कर्मचारी आल्यानंतर मास्क घालणाऱ्या आणि मास्कच न वापरणाऱ्यांवर प्रशासनाने सोमवारपासून (दि.२२) अधिक जोमाने कारवाई सुरू केली आहे. सकाळी खडकाळी, सारडा सर्कल भागात त्यानंतर मुंबई नाका, महामार्ग बसस्थानक अशा विविध भागात जाऊन धडक कारवाई केली. महापालिकेचे पथक कारवाईसाठी दाखल झाल्यानंतर बसस्थानकात आल्यानंतर प्रवाशांप्रमाणे महामंडळाचे वाहक आणि अन्य कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. अनेकांनी खिशातील रूमाल काढून तोंडाला लावले तर काहींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही मनपाच्या पथकाने अशा नागरिकांना पकडून कारवाई केली. याशिवाय शहरातील सहाही विभागात बाजारपेठा, व्यापारी संकुले, भाजी बाजार अशा सर्वच सार्वजनिक ठिकाणी महापालिकेने धडक मोहीम राबवली आणि २२६ नागरिकांकडून ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला.
इन्फो..
आठवडाभरात ७० जणांना दंड
नाशिक महापालिकेने आठवडाभरात ७० जणांना दंड करण्यात आला आहे. त्यात गेल्या शनिवारीच (दि.२९) एकाच दिवसात १२० जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
इन्फो..
आता थुंकीबहाद्दरांनाही हजार रुपयांचा दंड
नाशिक शहरात कोरोनाचा संकट रोखण्यासाठी मास्क न लावणाऱ्यांना आधी दोनशे रुपये दंड केला जात असे. मात्र आता मास्क न वापरणारे आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे अशा देाघांनाही आता पाचपट अधिक म्हणजेच एक हजार रुपये दंड घेण्यात येणार आहे. आयुक्त कैलास जाधव यांनी यासंदर्भात त्यांच्या विशेषाधिकारात आदेश जारी केली असून त्यामुळे आता मास्क नसला किंवा रस्त्यावर थुंकले तरी एक हजार रुपये मोजावे लागणार आहे.
इन्फो...
अशी झाली कारवाई
विभाग प्रकरणे दंड
नााशिकरोड ४० ८ हजार रुपये
पश्चिम- २५ ७ हजार रुपये
पूर्व- २१ ९ हजार रुपये
सिडको- ३६ ७ हजार २००
पंचवटी- ५२ १० हजार ४००
सातपूर ४२ ८ हजार ४००
एकूण २२६ ५० हजार रुपये