गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By admin | Published: October 15, 2016 12:27 AM2016-10-15T00:27:00+5:302016-10-15T00:52:23+5:30
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
वीरगाव : लाड शाखीय वाणी समाजाचा उपक्रमनामपूर : विद्यार्थीदशेत मिळणारे छोटेसे बक्षीससुद्धा खूप मोठी प्रेरणा असते. विद्यार्थ्यांनी बालवयापासून खूप अभ्यास करून बक्षिसे मिळवावीत, यामुळे भविष्यकाळ उज्ज्वल होतो, असे मत उन्नती संस्थेच्या नामपूर अलई विद्यालयाच्या मुख्याध्यापक स्नेहलता नेरकर यांंनी व्यक्त केले. वीरगाव येथे लाड शाखीय वाणी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष अशोक कोठावदे होते.
प्रारंभी सहायक परिवहन अधिकारी पल्लवी कोठावदे-लोंढे यांनी विद्यार्थ्यांना एमपीएसपी, यूपीएससी आदि स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमात लक्ष घालून यश संपादन करावे, असे सांगितले़ याप्रसंगी चेतन कोठावदे या विद्यार्थ्याने जीवनात मेहनत घेतल्यास काय फळ मिळते याची विविध उदाहरणे दिली. स्व. दत्तात्रेय मल्हारी कोठावदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी गुणवंत सोहळा आयोजित केला जातो. यावेळी अशोक कोठावदे, योगेश कोठावदे, पल्लवी लोंढे, स्नेहलता नेरकर, सुधाकर कोठावदे, दीपक कोठावदे, भारती कोठावदे यांनी विद्यार्थ्यांना भावी जीवनात यशस्वी कसे व्हावे याविषयी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सुधाकर कोठावदे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याचे दीपक कोठावदे, गौतम गहिवड, हर्षद कोठावदे यांनी सांगितले. (वार्ताहर)