सुतारखेडे जनता विद्यालयात स्वच्छता फेरी संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 05:36 PM2018-08-08T17:36:46+5:302018-08-08T17:39:16+5:30
चांदवड - चांदवड तालुक्यातील सुतारखेडे जनता विद्यालयात शासनाच्या स्वच्छ सर्व्हेक्षण १८ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. मुख्याध्यापक एम.एम. हांडगे यांची स्वच्छ सर्व्हेक्षण -१८ अॅप प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी डाऊनलोड करुन वास्तव माहिती भरणे, प्लॉस्टीक बंदीची गरज व दुष्परिणाम या विषयी मार्गदर्शन केले
चांदवड - चांदवड तालुक्यातील सुतारखेडे जनता विद्यालयात शासनाच्या स्वच्छ सर्व्हेक्षण १८ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. मुख्याध्यापक एम.एम. हांडगे यांची स्वच्छ सर्व्हेक्षण -१८ अॅप प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी डाऊनलोड करुन वास्तव माहिती भरणे, प्लॉस्टीक बंदीची गरज व दुष्परिणाम या विषयी मार्गदर्शन केले याप्रसंगी मविप्रचे जनता विद्यालय, प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत सुतारखेडे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता रॅली काढून जनजागृत्ती करण्यात आली. शेवटी प्लॉस्टीक मुक्तीची शपथ, ग्रामस्थ व शिक्षक व विद्यार्थी , पदाधिकारी यांनी घेतली दत्तु सोनवणे यांनी शपथ वाचन केले. यावेळी सरपंच सुमनताई गांगुर्डे, ग्रामसेवीका देवरे, मुख्याध्यापक मधुकर हांडगे, दिंगंबर शेळके, समाधान बिडगर, मुंकूद भोजणे, खैरनार, प्राथमिक मुख्याध्यापक श्रीमती साबळे, विलास पाटील, योगीता जाधव,प्रमिला ठाकरे, किरण उघडे, किशोर शिंदे, बागुल, शिरसाठ, प्रकाश गांगुर्डे व ग्रामस्थ उपस्थित होते.