अखेर फायर बॉलच्या निविदेस स्थगिती! आयुक्तांचे आदेश; फायनान्स बीड उघडण्यास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 06:02 PM2021-01-02T18:02:08+5:302021-01-03T00:47:19+5:30

नाशिक : बाजारात अवघ्या एक ते दीड हजार रुपयांना मिळणाऱ्या फायर बॉल या अग्निशमन साधनासाठी तब्बल ६ हजार ३८८ रुपये प्रति नग असा दर लावून १३९१ नग खरेदी करण्याचा घाट महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी तूर्तास रोखला आहे. आयुक्तांनी या निविदेतील फायनान्शियल बीड हे बाजारातील फायर बॉलच्या किमती तपासून मगच उघडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे निविदेसाठी आटापिटा करणाऱ्यांची अडचण झाली आहे.

Fire Ball Tender Postponed Orders of the Commissioner; Refusal to open finance bids | अखेर फायर बॉलच्या निविदेस स्थगिती! आयुक्तांचे आदेश; फायनान्स बीड उघडण्यास मनाई

अखेर फायर बॉलच्या निविदेस स्थगिती! आयुक्तांचे आदेश; फायनान्स बीड उघडण्यास मनाई

Next

नाशिक : बाजारात अवघ्या एक ते दीड हजार रुपयांना मिळणाऱ्या फायर बॉल या अग्निशमन साधनासाठी तब्बल ६ हजार ३८८ रुपये प्रति नग असा दर लावून १३९१ नग खरेदी करण्याचा घाट महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी तूर्तास रोखला आहे. आयुक्तांनी या निविदेतील फायनान्शियल बीड हे बाजारातील फायर बॉलच्या किमती तपासून मगच उघडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे निविदेसाठी आटापिटा करणाऱ्यांची अडचण झाली आहे.
नाशिक महापालिकेच्या अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी फायर बॉल खरेदी करण्यासाठी गेल्या महिन्याच्या अखेरीस निविदा मागवल्या होत्या. या निविदा सादर करण्याची अंतिम तारीख ३० डिसेंबर अशी होती. फायर बॉल निविदेतील गोंधळ आणि अवघ्या १२ ते १३ लाख रुपयांच्या फायर बॉल खरेदीसाठी तब्बल ८९ लाख रुपये मोजण्याचा प्रकार ह्यलोकमतह्णने उघडकीस आल्यानंतर प्रशासनाची धावपळ उडाली. संबंधित विभागाने ३० डिसेंबर या दिवशी निविदा सादर होताच दुसऱ्याच दिवशी निविदा उघडण्याची आणि त्या मंजुरीची घाई सुरू केली. मात्र आयुक्त कैलास जाधव यांनी ह्यलोकमतह्णच्या वृत्ताची दखल घेऊन कारवाई स्थगित करण्यास भाग पाडले.

फायर बॉलच्या बाजारातील आणि वितरकांकडे असलेल्या किमती तपासून त्यानंतर फायनान्शियल बीड उघडण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. बाजारात अशा प्रकारचे फायर बॉल हे ६०० ते ८०० रुपयांपासून उपलब्ध आहेत. १९९पेक्षा अधिक नग खरेदी करायचे असल्यास प्रति नग दर याहीपेक्षा कमी होऊ शकतात. अमेझॉनसारख्या अनेक ऑनलाइन शॉपिंग साइटवर त्याचे दर आणखी कमी आहेत. मात्र, महापालिकेने निविदा काढताना एका फायर बॉलची किंमत ६ हजार ३८८ रुपये अशी गृहीत धरली आहे. एकूण १३९१ नग खरेदी करण्यासाठी ८९ लाख रुपये मोजण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. मुळातच आयएसआय मान्यता नसलेले हे फायर बॉल असून त्याची सरकारी किंमत उपलब्ध नाही हीच बाब पथ्यावर पाडून घेत फायर बॉल खरेदीसाठी अवास्तव किंमत ठरविण्यात आली आहे. याशिवाय ड्रम साइज नावाचा भलताच प्रकार निविदेत दाखविण्यात आला आहे. निविदेत आयएसआय मार्कची कोणतीही अट नाही की किंवा उत्पादन मेकचादेखील उल्लेख केलेला नाही. त्यामुळे सुमार दर्जाचे फायर बॉल खरेदी करण्याचा घाट काही अधिकारी, नगरसेवक तसेच ठेकेदार यांच्या संगनमताने सुरू असल्याचे उघड होत आहे. यापूर्वी गेल्या सोमवारी आयुक्त कैलास जाधव यांनी खातेप्रमुखांच्या बैठकीतदेखील अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाण आणि अग्निशमन दलप्रमुखांना शासनाच्या जेम्स पोर्टलवर यासंदर्भातील दर तपासणीचे आदेश दिले होते. मात्र हे सरकारी मान्यता नसलेले साधन असल्याने अशा प्रकारचे उत्पादन जेम्स पोर्टलवर नसल्याचे समजते. तरीही बाजारात उपलब्ध असलेले फायर बॉल हे अग्निशमक दलाची गरज म्हणून खरेदी करण्यासाठी आवश्यक आहे, असे सांगून फाईल तयार करण्यात आली आहे. त्यासाठी एका अशासकीय ठरावाचा आधार घेण्यात आला आहे. आता आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार कोणत्या किमती पडताळून बघून या निविदेवर कार्यवाही होते हे बघणे महत्त्वाचे आहे.
इन्फो

फायर बॉलसारख्या अशा प्रकारच्या साधनांची आग विझवण्यासाठी कितपत उपयुक्तता आहे याची कोणतीही पडताळणी अग्निशमन दलाने केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार हे फायर बॉल जेमतेम एक वर्ष टिकतात. भारतीय हवामानामुळे बॉलमधील अग्निरोधक पावडरही घट्ट होते किंवा सादळून जाते, त्यामुळे वर्षभरानंतर आग विझविण्यासाठी अशा प्रकारे फायबर बॉलचा वापर केला तरी त्यातील ५० टक्के उपयुक्त ठरतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Web Title: Fire Ball Tender Postponed Orders of the Commissioner; Refusal to open finance bids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.