घोरवड घाटात अपघातग्रस्त केमिकलच्या टॅँकरला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:11 AM2021-07-10T04:11:24+5:302021-07-10T04:11:24+5:30
बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास अहमदनगरकडून मुंबईच्या दिशेने केमिकल घेऊन जाणाऱ्या टँकरचा (एम. एच. ४६ ए. एफ. ४२९९) घोरवड ...
बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास अहमदनगरकडून मुंबईच्या दिशेने केमिकल घेऊन जाणाऱ्या टँकरचा (एम. एच. ४६ ए. एफ. ४२९९) घोरवड घाटात अपघात झाला होता. दिवसभर टँकर घोरवड घाटात उलटलेल्या अवस्थेत होता. टँकरला गळती लागल्याने त्यातून काही प्रमाणात केमिकलची गळती होत होती. बुधवारी रात्री साडेसात-आठ वाजेच्या सुमारास अचानक गळती झालेल्या केमिकल व टॅँकरला आग लागली. त्यामुळे घोरवड घाटात आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. टँकरनेही पेट घेतला. रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांनी सिन्नर पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक रामदास जाधव, हवालदार बाबा पगारे, योगेश बुरकुल यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सिन्नर नगर परिषद व एमआयडीसीच्या अग्निशामक बंबांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सुमारे तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. अपघात होऊन टँकर दिवसभर घाटात पडून होता. त्यामुळे त्यात चालक किंवा अन्य कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र, परिसरातील अनेक झाडे जळून खाक झाली.
फोटो - ०९ सिन्नर ॲक्सिडेंट
सिन्नर-घोटी महामार्गावर पांढुर्लीजवळील घोरवड घाटात अपघात होऊन उलटलेल्या टॅँकरमधील केमिकलने पेट घेतल्याने आगीच्या ज्वाळांत झाडांचेही नुकसान झाले.
090721\09nsk_15_09072021_13.jpg
फोटो - ०९ सिन्नर ॲक्सीडेंट सिन्नर-घोटी महामार्गावर पांढुर्लीजवळील घोरवड घाटात अपघात होऊन उलटलेल्या टॅँकरमधील केमिकलने पेट घेतल्याने आगीच्या ज्वाळांत झाडांचेही नुकसान झाले.