नाशिकमधील मदनी नगर विद्युत उपकेंद्रात शॉर्टसर्किटमूळे आग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 10:48 AM2017-12-29T10:48:56+5:302017-12-29T10:49:16+5:30
मदनी नगर विद्युत उपकेंद्रात शुक्रवारी रात्री मुख्य विद्युत वाहिनीत बिघाडामुळे शाटसर्किट झाल्याने परिसरात अंधार पसरला आहे.
मालेगाव (नाशिक)- मदनी नगर विद्युत उपकेंद्रात शुक्रवारी रात्री मुख्य विद्युत वाहिनीत बिघाडामुळे शाटसर्किट झाल्याने परिसरात अंधार पसरला आहे.
दाभाडी विद्युत उपकेंद्रातून मदनी नगर उपकेंद्रात विद्युत पुरवठा करण्यात येतो. या मुख्य उच्च दाबविद्युत वाहिनीत बिघाड झाल्याने शाटसर्किट झाले. शाटसर्किटमुळे आग लागून मोठ्या प्रमाणावर सिलेंडर फुटल्या सारखे आवाज होवू लागले. शॉर्टसर्किटमुळे झालेला प्रकाश किमान तीन किलोमीटर अंतरावरील नागरिकांना धडकी भरणारा होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी घरातून बाहेर पळाले होते. अशा परिस्थितीत सेवा बजावणाऱ्या जगताप नामक कर्मचारी यांनी जिवाची पर्वा न करता विद्युत पुरवठा खंडित केला. शाटसर्किट कशामुळे झाला याचे कारण अद्याप कळू शकले नाही. यामुळे किती नुकसान झाले याचा अंदाज समोर आले नाही. रात्री उशिरा बिघाड कुठे व कशामुळे झाला याबाबत शोधकार्य सुरु होते.
गेल्या 25 वर्षाच्या सेवेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर शाटसर्किट पाहिले नव्हते. रात्रीची वेळ असल्याने कधीही पाहिला नाही असा प्रकाश होता. 10 वर्षांपूर्वी इचलकरंजी येथे अशाच प्रकारे घडला होता मात्र त्याची तीव्रता कमी होती. त्यावेळच्या अनुभव गाठीशी असल्याने आज जीवावर खेळून विद्युत पुरवठा खंडित केल्याची माहिती कर्मचाऱ्याने दिली आहे.